भावसार समाजाचा स्नेह मिलन सोहळा संपन्न

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.22फेब्रुवारी):- समाज एकसंघ, संघटित व्हावा व समाजातील घटकांचे एकमेकांविषयी स्नेहबंध वाढीस लागला ,सर्वांच्या सहमतीने सामाजिक कार्य जोमाने वाढावे याकरिता भावसार युवा एकता महिला आघाडी चंद्रपूर,क्षत्रिय भावसार, व छिपा भावसार महिला मंडळाच्या वतीने स्नेह मिलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला.भावसार युवा एकता महिला आघाडीने समाजाचा स्नेहमीलन सोहळा ,शिवजयंती,हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटक सौ मीनाक्षी करिये,अध्यक्ष सौ नीलिमा साधनकर,प्रमुख अतिथी सौ योगिता धानेवार जिल्हाध्यक्ष, सौ अभिलाषा मैंदळकर शहर अध्यक्ष,अश्विनी वैश, कविता भागवत,कमलताई अलोने, छायाताई बरडे, प्रणिता साधनकर,वैशाली भागवत आदी उपस्तीत होते.
सौ मीनाक्षी करिये म्हणाल्या समाज एकजूट करून समाजाचे सशक्तीकरण गरजेचे आहे,एक लाठी को तो कोहिभी तोड सकता है मगर लाठी के भारे को कोई नहि तोड सकता. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ नीलिमा साधनकर म्हणाल्या शत्रपती शिवाजी महाराजांनी जसे एक एक मावळे जमवून स्वराज्याचे स्वप्न साकारले तसेच भावसार युवा एकता महिला आघाडीने समाज एकसंघ करण्याचा प्रण केला आहे.

कार्यक्रमाला वैशाली जोगी,जान्हवी मैंदळकर,प्रीती लाखदिवे,उज्वला दखणे, मीनाक्षी अलोने,हर्षाला दखणे,शीतल रंगदल, शीतल जवाडे, संध्या मैंदळकर,लता जोगी,वाच्चला बरडे,आशा जोगी,आरती गोजे,कांता दखणे,जयश्री गोजे,अर्चना अलोने,पायल बरडे,मनीषा आंबेकर,प्रगती बरडे यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. संचालन सौ अभिलाषा मैंदळकर,तर आभारप्रदर्शन वैशाली जोगी यांनी केले.