वामन कांबळे यांची स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी निवड

✒️सिंधुदुर्ग(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सिंधुदुर्ग(दि.22फेब्रुवारी):-स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन संलग्न स्वतंत्र मजदूर युनियनच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर वेंगुर्ला येथे वेंगुर्ला नगर परिषद व आंबेडकरी विचारांच्या कामगार चळवळीतील पदाधिकारी यांची संयुक्तपणे सभा सागर रामभाऊ तायडे अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

सदर सभेत आंबेडकरी विचारांच्या कामगार चळवळीतील जेष्ठ नेते वेंगुर्ला नगरपरिषदचे माझी कर्मचारी, नगरसेवक आणि नगराध्यक्ष राहिलेले आयु वामन धोंडू कांबळे यांची स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी निवड,आणि जिल्हा कमिटीसाठी वेंगुर्ला नगर पंचायतचे दोन प्रतिनिधी अनिल वेंगुर्लेकर सुनिल पवार यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.

स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन राज्य अध्यक्ष गितेश पवार, सरचिटणीस रविंद्र सूर्यवंशी, कोषाध्यक्ष कालिदास रोटे,कार्यालय सचिव निलेश नांदवडेकर,वेंगुर्ला नगरपरिषद चे अध्यक्ष अनिल वेंगुर्लेकर,पंकज पाटणकर सचिव वेंगुर्ला नगर पंचायत यांच्या उपस्थितीत जिल्हा कमिटीची निवड करण्यात आली.

यावेळी मेघना घाटकर,शुभांगी जाधव, किरण जाधव, निखिल पवार,संतोष चांदुरकर,गोपाळ राजापूरकर,अक्षय मिसाळ सह सर्व पदाधिकारी,कामगार, कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुनील पवार यांनी तर आभार प्रदर्शन कैलास वेंगुर्लेकर यांनी केले,

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED