पार्ङी येथे सिमेंट रोङचे व नालीचे भूमिपूजन

22

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.22फेब्रुवारी):-अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाचा विकास योजना सन 2020/ 21 अंतर्गत पुसद तालुक्यातील पार्ङी येथे 16 लाख रुपयाचे सिमेंट रोड व सांडपाण्याच्या नाल्याचे भूमिपूजन पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनीलभाऊ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार इंद्रनीलभाऊ नाईक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन पार्ङी ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सौ रंजना ताई घाडगे ह्या होत्या प्रमुख अतिथी म्हणून सरपंच जयश्री भोणे उपसरपंच सौ संगीता ज्ञानेश्वर राठोड ग्रामपंचायत सदस्य समाधान केवटे.रामदास केवटे .नंदू कांबळे .सलीम भाई करण ढेकळे पंडीत घाङगे.समाधान शिनगारे. उपस्थित होते

यावेळी वार्ड क्रमांक 2 साई नगर मध्ये सिमेंट रोड व सांडपाण्याच्या नालीचे भूमिपूजन आमदार इंद्रनीलभाऊ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला पार्ङी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व गावकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण बरडे यांनी केले.आभार प्रदर्शन ग्रामपंचायतीचे सचिव ए.बी .जाधव यांनी मानले