ब्रम्हपुरी तालुक्यातील ‘त्या’ रो.ह.यो. च्या कामात अनियमितता

25

🔹ग्रामसेवकांवर विभागीय चौकशीचे निर्देश!

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.23फेब्रुवारी):-पंचायत समिती ब्रम्हपुरीच्या अखत्यारीत येत असलेल्या ग्रामपंचायती अंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेची कामे करण्यात आली, या कामात अनियमितता आढळून आल्याने त्यांच्या बोगस कामाचे देयक थांबविण्यात येऊन सदर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाविरुध्द विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हा मुख्यालयाकडून ब्रम्हपुरी प्रशासनाला देण्यात आले.

प्राप्त माहिती नुसार समजते की, सन 2017 ते 2019 या कालावधीत ब्रम्हपुरी तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीमध्ये रोहयोअंतर्गत सिमेन्ट रस्ता, सिमेन्ट नाली, पांदन रस्ता, मुरुम व खडीकरण इत्यादी कामे करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. या ही सर्व कामे संशयास्पद वाटल्याने जिल्हा पातळीवरुन या कामाची बन चौकशी करण्यात आली. चौकशीत – कुशल-अकुशल कामामध्ये फार मोठ्या शर प्रमाणात अनियमितता झालेली असल्याचे आढळून आले. असून चौदाही ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर विभागीय चौकशीची टांगती तलवार
आहे.

सन 2017-2019 या, कालावधीत केलेल्या रोहयोच्या कामात अनियमितता असले ल्या ग्रामपंचायतीमध्ये चौगान, मेंडकी, रामपुरी, सोंद्री, चांदगाव, रानबोथली, मुई, भूज, तोरगाव (खुर्द.), कुडेसावली, कालेता, लाडज, कन्हाळगाव, आवळगाव इत्यादींचा समावेश आहे.