लाकडाऊन कालावधीमध्ये शाळेची फी जमा करण्यातुन सूट देण्यात यावी- वचित बहुजन आघाडी

29

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

उस्मानाबाद(दि.24फेब्रुवारी):- राज्यातील कोरोना आजाराच्या फैलावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे . राज्य शासनाने दि . 14 एप्रिल 2020 पर्यंत संपुर्ण राज्यात बंदी लागु करण्यात आली होती . सर्व नागरिकांना घरामध्येच राहण्याच्या सुचना दिलेल्या होत्या . संपुर्ण हालचालीवर घालण्यात आलेली बंदी , पर्यायाने नागरिकांना जावणारी पैशाची उपलब्धता याबाबी विचारात घेता सर्व बोर्डाच्या , सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विनंती करण्यात येते की , विद्यार्थी आणि पालकांकडुन शाळेची चालु वर्षांची व आगामी वर्षाची फी गोळा करतांना सहानुभुती दाखविणे आवश्यक राहील.

लोकडाऊन च्या कालावधीमध्ये फी जमा करण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये . त्यानंतर सरकारने महत्वपुपर्ण पाऊल उचलत लॉकडाऊन काळात पालकांकडुन फी न आकारण्याचे निर्देश दिले आहे . तरी देखील सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वतीने विदयार्थी पालकाकडुन सक्तीने फीस वसुली केली जात आहे . तरी मे . जिल्हाधिकारी साहेबांना विनंती की , लाकडाऊन या काळातील सर्व विदयार्थ्याची शालेय फीस माफ करुन पालकांची होणारी आर्थिक पिळवणुक थांबवावी . व शासनाच्या दिलेल्या आदेशाचे पालन व्हावे