बावळी विहीरीसाठी पुरातन प्रेमीचे आंदोलन

26

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.24फेब्रुवारी):-चिमुर तालुक्यातील प्राचिन विहीरी मुळे चिमुर तालुक्याला वैभव प्राप्त झाले. या विहीरी च्या संवर्धनाची जबाबदारी पुरातन प्रेमीनी आपल्या खांद्यावर घेतली. काळाच्या ओघात चिमुर तालुक्यातील प्राचिन पाय-याच्या बावळी विहीरी संकटात सापडल्या असुन चारही विहीरीचे अस्तित्व धोक्यात आहे.

चिमुर तालुक्यातील बावळी विहीरी मुळे इतिहासात मोलाची भर पडली आहे. या चारही विहीरी च्या संवर्धन होण्यासाठी पुरातन प्रेमीचकडुन कोलारा( तु) पाय-याच्या बावळी विहिरीवर आंदोलन करण्यात आले.

पुरातन प्रेमी कडुन पुरातन विभागाला वारंवार निवेदन देऊन ही विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे चारही बावळी विहीरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

चिमुर तालुक्यातील कोलारा तु, गडपिपरी, तिरखुरा रोडवरील बावळी विहीर, पिंपळनेरी या चारही विहीरी इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. या विहीरीचे दगडं निघाले आहेत.

या विहीरी वर कोरीव कामाचे व मजबुती चे उत्तम उदाहरण आहे. पूर्वजांचा मौल्यवान इतिहास वाचविण्यासाठी पुरातन प्रेमी कडुन आंदोलन करण्यात आले

यावेळी पुरातन प्रेमी कवडू लोहकरे, सुशांत इंदोरकर, ऋषिकेश बाहुरे, मोहन सातपैसे विशाल बारस्कर व पर्यटक उपस्थित होते.