पीरसाहेब देवस्थान फक्त दर्शनासाठी परवानगी

23

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.24फेब्रुवारी):- खातगुण ,ता. खटाव. जि. सातारा यांचे येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या राजे पिर साहेब बागसवार यांचे दर्शनासाठी परवानगी असून,कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावावामुळे पीरसाहेब देवस्थान ट्रस्ट खातगुण ता खटाव जि सातारा यांचे निर्णयानुसार दि 26/02/2021वार शुक्रवार पासून दर्ग्यामध्ये धार्मिक कार्यक्रम व कंदुरी(न्याज) करण्यास मनाई करणेत येत आहे.

फक्त दर्शनासाठी परवानगी देणेत येत आहे .भाविकांनी दर्शनास येताना कोरोना प्रतिबंध करनेस आवश्यक नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे देवस्थान च्या वतीने सांगण्यात आले.