दानपेटी फोडुन चोरी करणारा पोलिसांचे ताब्यात

28

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.25फेब्रुवारी):-मंदीरातील दानपेटी फोडुन चोरी केल्याप्रकरणी शहरातील रहिवासी अमोल पुलकंठवार यास हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली.
प्राप्त माहितीनुसार दिनांक 22 मार्च रोजी दुपारी कोणीतरी अज्ञात चोरट्याने शहरातील गौतम वार्ड येथील हनुमान मंदीर येथील दान पेटीचे कुलूप तोडुन अंदाजे 5 हजार रुपयाचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी अपराध क्र. 0181/2021 कलम 380 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद केला.
यापुर्वीसुद्धा दि. 02 फेब्रूवारी रोजी मंदीरातील दानपेटीतील रक्कमचोरीचा गुन्हा नोंद असुन, त्याबाबत अपराध क्र. 118/2021 कलम 457, 380 भादंवि. चा नोंद केला.

सदर तपास ठाणेदार संपत चव्हाण यांनी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे सोपविला.सतत होणाऱ्या मंदीर चोरीच्या प्रकरणी डी.बी. पथकाने आरोपीचा शोध घेतला.यात खबरीद्वारा शोध घेऊन पोलिसांनी आरोपी अमोल प्रभाकर पुलकंठवार, वय 28 वर्ष, रा. सेन्ट्रल वार्ड, हिंगणधाट यास अटक केली. त्याचे घरझडतीतुन मंदीरातुन दानपेटी फोडुन चोरलेले सूटे पैसे व नगदी अशी रोख रक्कम जप्त केली.

आरोपीस विचारपुस केली असता, त्याने अप. क्र. 118/2021 कलम 457, 380 भादंविच्या अंतर्गत 01 फेब्रूवारी रोजी शहरातील महाराणी दुर्गावती समाज मंदीर नेहरू वार्ड येथील मंदीरातील दानपेटी फोडल्याची कबुली दिल्यावरून मंदीरातील दानपेटी फोडल्याचे दोन गुन्हे उघडकीसआले. सदरची कामगीरी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, पोलिस ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, पोशि सचिन भारशंकर यांनी केली