कुंडलवाडीत विना मास्‍क फिरणा-या चौदा जणावंर दंडात्‍मक कारवाई

73

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.25फेब्रुवारी):-बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथे कारोनाचा प्रार्दूर्भाव पुन्‍हा वाढू लागल्‍याने कुंडलवाडी नगरप्रशासनाकडून विनामास्‍क फिरणा-या चौदा जनावर प्रत्‍येकी २०० रुपये प्रमाणे २ हजार ८०० रूपयाची दंडात्‍मक कारवाई करुन वसूल केल्‍याची माहिती नगरपरिषेदेचे मुख्‍याधिकारी ज्ञानेश्‍वर ठोबंरे यांनी दिली.कोरोणाचा प्रार्दूर्भाव टाळण्‍यासाठी मास्‍कचा वापर करावे असे आवाहाण नगरप्रशासनाकडून करण्‍यात आले असुन दिनांक २३ /२/२०२१ रोजी नगरप्रशास व पोलिस प्रशासन यांच्‍या वतीने आवाहाण करण्‍यात आले. पाटर्या, सभा ,उत्‍सव, यात्रा, यावरती शासनाकडून नियम करण्‍यात आले असुन याची काटेकोर पणे आमलबजावणी करणे गरजेचे आहे.

विनाकारण बाहेर पडणे,मास्‍क न वापरने, गर्दी करणे,प्रतिष्‍ठाणामध्‍ये ५ पेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती न राहणे यामुळे कोरोणा पुन्‍हा वाढू लागले आहे.परिस्थिती चिंताजणक होने आगोदरचे आपण खबरदारी घेणे गरजेचे आहे.आवश्‍यकता असेल तरच मास्‍क वापरुन बाहेर पडने सँनिटायजरचा वापर वेळोवेळी करणे ,सामाजिक अंतर पाळणे,कार्यक्रम काही काळासाठी थांबवणे,नगरपालिका प्रशान,पोलिस प्रशासन, आरोग्य प्रशासनास सहाकार्य करावे कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्‍यासाठी जनजागृती होणे गरजेचे असुन जनतेने स्‍वंयप्रेरणेने आवश्‍यक खबरदारी घेणे गरजेचे आहे असे आवाहाण मुख्‍याधिकारी ज्ञानेश्‍वर डोबंरे यांनी केले आहे.