अकलूज ग्रामपंचायतमधील हेवेदेवे संग्रामनगर ग्रामपंचायतमध्येबमाने-पाटील गटात नाराजीचा सुर

28

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.25फेब्रुवारी):-संग्रामनगर ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक 20-21 ते 24-25 या कालावधीसाठी निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा घवघवीत यशाने निवडून आलेल्या होत्या. त्यामध्ये माजी उपसरपंच श्रीराज नंदकुमार माने पाटील हेही ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले होते. त्यांचीच वर्णी संग्रामनगर ग्रामपंचायतच्या सरपंच पदी होणार असल्याची चर्चा असताना श्रीराज माने पाटील यांची सरपंच पदी वर्णी न लागल्याने समर्थकातून नाराजीचा सूर उमटत आहे. तर राजकीय वर्तुळामध्ये अकलुज ग्रामपंचायतमधील मोहिते-पाटील यांचा पराभव माने पाटील यांच्याकडून झालेला होता.या पराभवाचे पडसाद संग्रामनगर ग्रामपंचायतमध्ये उमटले असल्याचे चर्चिले जात आहे.

संग्रामनगर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. राजवर्धनी श्रीराज माने पाटील यांनी गत पाच वर्षांमध्ये सरपंच पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेली होती. विकासाच्या जोरावर व मतदार आणि नागरिकांच्या थेट संपर्कातून त्यांनी भरीव असे कार्य केले होते. विकास व जनसंपर्काच्या जोरावर सर्वच्या सर्व ग्रामपंचायतमध्ये सदस्य निवडून आणण्यामध्ये माने पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. माने पाटील आणि मोहिते पाटील यांचे राजकीय वितुष्ट असतानासुद्धा श्रीराज माने पाटील व सौ. राजवर्धनी माने पाटील यांनी मोहिते पाटील यांच्यासोबत राजकारणामध्ये राहून भावभावकीच्या सोबत न राहता मोहिते पाटील यांच्यासोबत राजकारणात राहिलेले आहेत. सरपंच पदाच्या कार्यकालात राजवर्धनी माने पाटील यांनी मोहिते-पाटील यांना विश्वासात घेऊन संपूर्ण ग्रामपंचायतीचा कारभार केलेला आहे.

कोणत्याही विकास कामात अथवा योजनेमध्ये व्यक्तिगत निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे मोहिते पाटील यांचाही विश्वास होता, खासकरून मोठे दादा यांचाही विशेष विश्वास होता. तरीसुद्धा सरपंचपदी मोहिते पाटील यांच्याकडून श्रीराज माने पाटील यांना सरपंचपदी विराजमान करण्याचे ठरलेले असताना कुठे माशी शिंकली ? असा सवाल श्रीराज माने पाटील समर्थकातून उपस्थित होऊन मोहिते-पाटील यांच्याकडून विश्वास घात केला असल्याचा आरोप केला जात असून नाराजीचा सूर उमटला आहे.

ग्रामपंचा अकलुज ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माने पाटील यांचेकडून मोहिते-पाटील यांचा दारुण पराभव झालेला असल्याने या पराभवाचे शल्य मनामध्ये ठेवून माने पाटील यांना संग्रामनगर ग्रामपंचायत सरपंच पदापासून दूर ठेवलेले असल्याने ग्रामीण भागात म्हण परिचित आहे, ‘जखम रेड्याला, डाग पखालीला’, या म्हणीचा प्रत्यय येत असल्याने माळशिरस तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आलेले आहे.श्रीराज माने पाटील एक संयमी युवा नेतृत्व आहेत. त्यांच्याकडे खिलाडू वृत्ती आहे. उत्कृष्ट क्रिकेट खेळत असल्याने अनेक ठिकाणांची मैदाने मारलेली आहेत. भविष्यामध्ये त्यांची गुगली काय असणार ? किंवा षटकार कसा मारणार ? याकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.