११ वर्षीय मुलीचा शोध घेण्यात अड्याळ पोलिसांना यश

34

✒️भंडारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भंडारा(दि.25फेब्रुवारी):- जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथील ११ वर्षीय मुलगी कोणाला न सांगता निघून गेली . नातेवाईकांनी इतरत्र पाहिले असता ती मिळाली नाही. तात्काळ अड्याळ पोलिस स्टेशन गाठले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ चमू तयार करण्यात आली. व बारा तास आत मुलीच्या शोध घेण्यात यश आले. मुलीला नातेवाइकांना सुपूर्त केले.

प्रकरण अशाप्रकारे आहे की, फिर्याद हीची नातीन कु.नामे संजना विजय रंगारी वय ११ वर्ष राहणार वार्ड क्रमांक 0५ अड्याळ तालुका पवनी जिल्हा भंडारा ही दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ ला नवेगाव पाले. येथून अड्याळ ला येण्याकरिता एसटी बसने निघाली असता अड्याळ येथे पोहोचलीच नाही. फिर्यादीने तिचा इकडेतिकडे नातेवाईकांमध्ये शोध घेतला मिळून न आल्याने तिचा कोणीतरी अज्ञात ईसमाने अपहरण केले असावे ,असा संशय झाल्याने फिर्यादी आज रोजी पो.स्टे.ला येऊन दिलेल्या तक्रारीवरून नमुद गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

गुन्ह्य़ाचा पुढील तपास ठाणेदार सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शाखाली पीएसआय सोळुंके त्यांनी लगेच तपास टीम तयार करून सोबत Asi सोरते, पो ना रहांगडाले,
पो.अं. निर्वाण असे मिळून गुम मुलीचा शोध घेतला असता १२ तासाच्या आत शोध घेऊन गुम मुलगी सकाळी तिचे मामा सुनील रामटेके रा.चिचाल येथे सुखरूप मिळून आल्याने मुलीस नातेवाईक यांचे ताब्यात देण्यात आले .

११ वर्षीय मुलीचा शोध घेण्यात अड्याळ पोलिसांना १२ तासात यश आले त्यामुळे नातेवाइकांना सुखद आनंद मिळाला .परिसरात ठाणेदार सुशांत पाटील, उपनिरीक्षक कृष्णा सोळुंके,Asi सोरते, पो ना रहांगडाले,पो.अं. निर्वाण व पोलिस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांना अभिनंदन केले आहे.