बापरे! जयहिंद संस्थेत शिरला कोरोना, शिक्षक, शिपाई आणि सिक्युरिटी गार्ड आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य बाधित

28

🔺शिबिरात झाली होती अँन्टीजन टेस्ट, शाळा केली बंद

✒️जयदीप लौखे-मराठे,वेल्हाणे(धुळे प्रतिनिधी)

धुळे(दि.26फेब्रुवारी):- जयहिंद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात गुरूवारी महापालिकेने केलेल्या अँन्टीजन रॅपिड टेस्टमध्ये जयहिंद हायस्कुलमधील शिक्षक, कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.यात सगळ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही तपासणी करण्यात आली. यात कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्यांची संख्या वाढत आहे.

सायंकाळपर्यंत प्राचार्या व काही कर्मचारी हायस्कूलमध्ये बसून होते.जयहिंद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. जवळपास 150 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या संस्थेत काम करतात. दरम्यान विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद केली आहे.