सर्वसामान्यांना लुबाडणारे लाॅक डाऊन शासनाने करू नये

  66

  ?असे आव्हान पत्रकार शुभम बेद्रे यांनी केली आहे

  ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

  नांदेड(दि.26फेब्रुवारी):-शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना लुबाडणारे लॉकडाउन शासनाने जाहीर करू नये यामध्ये शेतकऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे असे शेतकरी पुत्र शुभम बेद्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे की जर शासनाने आता लॉकडाऊन केले तर शेतीमालाला हमीभाव मिळणार नाही यामुळे शेतकऱ्याची अवस्था होती.

  पण शासनाने दुसरे कुठलेही निर्बंध टाकून लॉक डाऊनलोड नकरता शेतकऱ्याला न्याय मिळवून शेतीमालाला योग्य तो हमीभाव द्यावा व सर्व सामान्य लोकांसाठी ज्याचे पोट दिवसभर केलेल्या मेहनतीवर अवलंबून असते त्यांनी त्या दिवशी काय करायचे याचा विचार थोडातरी शासनाने करावा एकीकडे कोरोना हा रोग खूप पसरत आहे.

  पण यासाठी शासनाने काही निर्बंध घालून जेथे जास्त प्रमाणात पसरलेला आहे तेथे तातडीने लक्ष देऊन आरोग्य विभागाचे कर्मचारी व पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून कडक निर्बंध घालावेत व असे वक्तव्य शेतकरी पुत्र शुभम बेद्रे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.