गडचिरोली जिल्ह्यातआज(26 फेब्रुवारी) एका मृत्यूसह 24 नवीन कोरोना बाधित तर 11 कोरोनामुक्त

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.26फेब्रुवारी):-आज जिल्हयात 24 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 11 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9514 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9322 वर पोहचली. तसेच सद्या 86 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 106 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन एक मृत 70 वर्षीय महिला इतर जिल्ह्यातील असून उच्च रक्तदाबग्रस्त होती. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.98 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.90 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.

नवीन 24 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 21 जणाचा समावेश असून अहेरी तालुक्यातील 1, धानोरा तालुक्यातील 1, कुरखेडा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 11 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 09, भामरागड तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील नवेगाव पेट्रोल पंप 1, नवेगाव रोड 1, तुलतुली कॉम्पलेक्स 1, स्थानिक 3, शिवाजी हायस्कुल 1, विवेकानंद नगर 1, रेड्डी गोडाऊन चौक 1, आशिर्वाद नगर 1, पाटबंधारे विभाग 1, कारमेर साईनगर 1, हनुमान वार्ड 1, राममंदिर 1, माडेतुकूम 1, झेडपी 4, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये पुराडा 1, यांचा समावेश आहे.तर इतर जिल्हयातील बाधिता मध्ये 2 जणांचा समावेश आहे.
*****