अडीच ते तीन महिने झाले तरी वनविभागाचे मांडवा येथील पिंजरा रिकामाच

28

🔸मांडवा येथील वानरे पकडून न्यावे अशी त्रस्त शेतकरी व ग्रामस्थांची मागणी

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.26फेब्रुवारी):-मौजे मांडवा येथे दोन वर्षापासून वानरांमुळे शेतकरी व गावकरी त्रस्त झाले होते.
कारण की वानरे खाण्याच्या शोधात गावात ये-जा करत असताना वानरांकडून गाव व शेत शिवारात येताना उच्छांद मांडत होते. गावात अनेकांच्या घरावरील टिनपत्रे व घराचे नुकसान करत होते .तसेच सोबतच वानरे घरात घुसून अन्नधान्य घेऊन पसार होत आहेत . वानरांकडून लहान मोठ्यांना इजा देखील झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या वानरांमुळे गावकरी व शेतकरी त्रस्त झाले होते . या वानरांचा बंदोबस्त लावावा या मागणीचे निवेदन शेतकरी व गावकऱ्यांनी २७/१०/२०२० रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय शेंबाळपिंपरी यांना देण्यात आले होते.

या तक्रारीची दखल घेत दि. ११/१२/२०२० रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय शेंबाळपिंपरी यांना अंदाजे २५ ते ३० वानेरांपैकी एक वानेर पिंजऱ्यामध्ये पकडून येण्यास यश आले. वानरे पकडण्यासाठी गावामध्ये दि.११/१२/२०२०पासून दोन पिंजरे ठेवून दिले आहेत. त्या पैकी एक पिंजरा काही दिवसापुर्वी वनविभागाने नेला आहे.व एक पिंजरा श्री समर्थ नागोजी महाराज संस्थान परिसरात ठेवलेला आहे .पंरतु वानरे पकडण्याची प्रक्रिया बंद आहे. काही नवीन उपायोजना करून बाकीचे राहिलेले वानरे लवकरात लवकर वनविभाग प्रशासनाने ही वानरे गावातुन पकडून घेऊन दूर नेऊन सोडावे कारण हातातोंडाशी आलेले हरभरा व गहु या पिकांचे नुकसान करीत आहेत.

या मागणीकरीता निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय शेंबाळपिंपरी यांना देण्यात आले . या निवेदनावर पोलीस पाटील, सरपंच ,उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिक तसेच शेतकरी व शेकडो गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देतेवेळी ग्राम परिवर्तन समिती अध्यक्ष योगेश पुलाते, उपाध्यक्ष अंकुश घावस, कार्याध्यक्ष ओमप्रसाद घुक्से,सदस्य कार्तिक धाड हे उपस्थित होते.