धुळे तालुका कुस्ती चाचणीचे यशस्वी आयोजन संपन्न

28
✒️जयदीप लौखे-मराठे,वेल्हाणे(धुळे प्रतिनिधी)

धुळे(दि.27फेब्रुवारी):- छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून धुळे तालुका तालीम संघाची निवड चाचणी स्पर्धा नुकतीच यशस्वी संपन्न झाली.अनेक दिवसापासुन भक्कम नेतृत्वाच्या प्रतिक्षेत असलेली धुळे जिल्हा तालीम संघाची जबाबदारी क्रीडाप्रेमी व क्रीडा क्षेत्राचे आधारस्तंभ माजी आ.राजवर्धन कदमबांडे यांचा कडे सर्व तालीम संघाने एकमताने टाकल्यानंतर कुस्ती क्षेत्राला जणू नवचैतन्य प्राप्त झाले.आणि त्यातच तालुका तालीम संघाची जबाबदारी युवा मल्लयोद्धा, आणी उदयोन्मुख नेतृत्व असा कल्याण गरुड या तरुण पाहिलवानाच्या हातात सोपवण्यात आली.

योगायोग म्हणजे अनेक दिवस दुरुस्तीच्या कारणाने व प्रशासनाच्या कार्यबाहुल्यामुळे बंद असलेले,आणि शहराच्या वैभवात एक सुवर्ण पान असलेले ‘जवाहर स्टेडियम’धुळे मनपाच्या स्थायी समिती सभापती सुनिल बैसाने यांच्या प्रयत्नाने दुरुस्ती,रंगरंगोटी होऊन जनतेसाठी पुन्हा खुले करण्यात आले.यामुळे शहरातील कुस्तीगीरांचा उत्साह गगनात पोहोचला.जिल्हाध्यक्ष बाबासो राजवर्धन कदमबांडे यांचा मार्गदर्शनात कल्याण गरुड पहिलवान व त्यांची सर्व तालुका तालीम संघाची नव्या दमाची,तरुण टीम जोरात कामाला लागली.
आदल्या दिवशी पाऊस आणि वाऱ्याचे थैमान ,पवनपुत्र हनुमानांच्या आशीर्वादाने शांत करत,शिवजन्मोत्सवाचे निमित्त साधत घेतलेली कुस्ती चाचणी स्पर्धा दणदणीत पार पडली हे त्यांचा संघठन शक्तीचे फलस्वरूप .कुठलीही देणगी,वर्गणी न करता स्व- खर्चातून कल्याण गरुड ,संजय वाडेकर,सचिव-ऍड.सचिन जाधव,भास्कर पाटील,संजय चौधरी,अभिषेक गवळी,आमीन शेख,राम कानडे व सोनू गिते, दिलीप जगताप इतर टीम ने हे यशस्वी आयोजन केले.रक्ताचे पाणी करून घाम गाळणाऱ्या कुस्तीगीरांनी ,स्पर्धेत उत्कृष्ट व प्रेक्षणीय कुस्त्या केल्या.डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या लढतींना जनतेने व कुस्ती प्रेमी वर्गाने रोख स्वरूपात बक्षिसे देऊन भरभरून दाद दिली.
प्रथम कुस्ती लावतांना माजी आमदार बाबासाहेब राजवर्धन कदमबांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख आण्णासाहेब हिलाल माळी, छत्रपती फाउंडेशन धुळे जिल्हा अध्यक्ष दादासो सचिन जाधव, भाऊसो पै.कल्याण गरुड माजी नगरसेवक बाबासो पै.संजय वाडेकर व अनेक धुळे जिल्ह्यातील मल्याळम उपस्थित होते.
*झालेल्या स्पर्धेत माती विभागातून*-
५७ किलो समीर खाटीक,
६१किलो नबील शहा,
६५ किलो राकीब बेग,
७०किलो समीर पठाण,
७४किलो प्रशांत फटकळ,
७९ किलो जतीन आव्हाळे,
८६ किलो योगेश कोळी,
९२किलो सुहास अंपळकर,
९७किलो गणेश पाटील,
केसरी गट -हर्षवर्धन सूर्यवंशी
*तर गादी विभागातून*
५७किलो सोमनाथ माळी,
६१ किलो चंद्रकांत गिते,
६५ किलो आतिष आव्हाळे,
७० किलो प्रवीण जाधव,
७४ किलो मुकेश माळी,
७९ किलो चंद्रशेखर गवळी,
८६ किलो हर्षल गवते,
९२ किलो द्रविड आघाव,
९७ किलो रितीक राजपूत,
केसरी गट जयेश फुलपगारे  या मल्लांनी प्रथम क्रमांक फटकावला.
‘कुस्ती ‘ला ‘नुरा’ हा कलंक लावतील अशा अनेक गोष्टी,प्रथा या स्पर्धेतून कायमच्या बंद करण्यात आल्या हे विशेषच.. या स्पर्धेत विजयी झालेले खेळाडू धुळे जिल्हा चाचणी स्पर्धेत सहभाग घेतील.सदर स्पर्धा जिल्हा तालीम संघ सचिव सुनील चौधरी सर व सहसचिव उमेश चौधरी यांच्या सह सर्व जेष्ठांच्या मार्गदर्शनात पार पडली. त्यात तांत्रिक समिती म्हणून त्रिलोक गुडलेकर,सचिन कऱ्हाड, गणेश फुलपगारे,शाम कानडे, पवन चौधरी,भिकन चौधरी यांनी मोलाची भूमिका निभावली.
यापुढे ही तालुका चाचणी स्पर्धे व्यतिरिक्त अनेक स्पर्धा व उपक्रम,कुस्तीच्या अथवा संघटनेचा नावावर कुठलीही वर्गणी न करता, कुस्तीगीरांसाठी घेण्याचा मानस यावेळी शक्ती व युक्ती मिश्रीत जोडी पैलवान कल्याण गरुड व ऍड. सचिन जाधव पैलवान यांनी व्यक्त केला.’कल्याण’ चा कारकिर्दीत कुस्तीगिरांचे ‘कल्याण’ होईल यात मात्र शंका नाही…