अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.26फेब्रुवारी):- ब्रह्मपुरी येथू कामकाज आटपून मेंडकी येथे स्वतःच्या गावकडे मोटार सायकल ने जात असताना रान बोथली गावा जवळील पुलावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मेंडकी येथील इसमाचा जागीच मृत्यू झाला सदर घटना दिनांक 26 फरवरी ला संध्याकाळी सातच्या सुमारास घडली मृतक इसमाचे नाव उत्तम ऋषी सोनुले वय (45) राहणार मेंडकी असे असून सदर मृतक इसम हा ग्रामपंचायत मेंडकी येथील उपसरपंच असल्याची माहिती आहे.

वृत्त लिहतो पर्यंत अज्ञात ट्रॅक्टरने धडक दिल्याची माहिती असून ट्रॅक्टर मालकाचे नाव अजून कळले नाही सदर घटनेची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना देण्यात आली असून अज्ञात आरोपीविरुद्ध ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.