ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान येथे आरोग्य शिबीर व कोविड / 19 च्या संदर्भात काळजी

36

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपूरी(दि.27फेब्रुवारी):- आज दिनांक 27/2/2021 ला ब्रम्हपूरी तालुक्यात चौगान येथे ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय तथा स्व राजीव गांधी कृषि तंत्रनिकेतन चौगान येथे आरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले या शिबीराचे मुख्य मार्गदर्शक डाॅ प्रशांत चौधरी प्राथमिक आरोग्य केंद्र चौगान तर प्रमुख अतिथी प्रथम नागरिक उमेश जी धोटे सरपंच ग्रामपचायत चौगान प्रा अंकुश जी मातेरे उपसपंच ग्रामपचायत चौगान ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान चे अध्यक्ष रुपेश निहाटे सर, प्राचार्य। हाश्मीनी शेखे कृपाकर चहांदे विडीओ वाॅलर्टिअर्स अशोक तोंडरे उपस्थित होते.

आरोग्य शिबीरा मध्ये BP ,HB,थाइरॉइड, वजन, करून जवळपास 55 विद्यार्थी व कर्मचारी यांची तपासणी केली व कोविड/19 सर्दभात स्वता कशी काळजी घ्यायचे यावर काय काय काळजी घ्यायचे या सर्दभात डॉ प्रशांत चौधरी यानी मार्गदर्शन केले त्याच बरोबर उमेश जी धोटे सरपंच व अंकुश मातेरे उपसपंच यांनी सुध्दा कोविड/19 च्या सर्दभात सुरक्षिता किती महत्वाचे आहे यावर प्रकाश टाकला आणि ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान यानी या आरोग्य शिबीराचे आयोजन केले त्यबद्दल निहाटे सर यांचे आभार मानले.

या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चौगान ची संर्पुण टिम व ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चे प्रार्चाय लालाजी मैद सर व सर्वे कर्मचारी यानी मोलाचे सहर्काय केले तर कार्यक्रमाचे संचालन अशोक तोंडरे सर प्रस्ताविक प्रा लालाजी मैद सर यानी केले.