सर्वसामान्यांचा विचार करून लॉकडाऊन न करता पर्यायी मार्ग काढावा

30

🔹राष्ट्रीय बजरंग दल जिल्हा संपर्कप्रमुख जीवनसिंग राजपूत यांची मागणी!!

✒️नांदुरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नांदुरा(दि.28फेब्रुवारी):-बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा लॉक डाऊन करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे जिल्ह्यात लॉक डाऊन ची अंमलबजावणी करण्यात आली आहे परंतु यामुळे जनजीवन विस्कळीत होतांना दिसत आहे सर्व उद्योगधंदे बंद असल्याने सर्वसामान्य जनतेवर आर्थिक संकट ओढवते लोकडाऊन मध्ये सर्वसामान्य जनतेचे हाल होतात. लॉक डाउन करणे सर्वसामान्य जनतेला परवडणार नाही मागील लॉक डाऊन मध्ये सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे हाल झाले शेतकरी कसा भरला गेला.

हे सर्व सूत्र आहे सर्व उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांचे रोजगार जाऊन सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडले व परिस्थिती सुधरायला खूप उशीर लागतो लॉक डाउन करण्यात आले तर शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचा थरकाप उडत आहे त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही कोरोना महामारीला आळा बसलाच पाहिजे. पण सर्वसामान्यांचा विचार करून जनजीवन विस्कळीत नव्हता पर्यायी मार्ग काढावा अशी मागणी नांदुरा शहरातून जोर धरत आहे.