ज्ञानोबा मुंडे राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्काराने सन्मानित

27

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी वैजनाथ(दि.2मार्च):- परळी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा मुंडे यांनी सामाजीक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना संत भाऊ बाबा वंजारी सेवा संघाच्या वतिने देण्यात येणार्या राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.तसेच ज्ञानोबा मुंडे यांची बहुभाषीक भाऊ बाबा वंजारी सेवासंघाच्या विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.परळीसह बीड जिल्ह्यात सामाजीक कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणारे ज्ञानोबा मुंडे यांनी समाजबांधवांची सेवा करण्याबरोबरच विवाहसोहळा,धार्मिक कार्यक्रमात सढळ हाताने मदत केली आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेवुन बहुभाषीक संत भाऊ बाबा वंजारी सेवा संघ संस्थापिका सौ.लक्ष्मी गरकळ यांनी त्यांची राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कारासाठी निवड केली.रविवार दि.28 फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड चे पोलिस आयुक्त मंचकराव इप्पर,जय भगवान सेवा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप,कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दादासाहेब मुंडे,पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे,नगरसेविका योगिता नागरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्ञानोबा मुंडे यांना हा राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्ञानोबा मुंडे यांना नुकताच प्रतिष्ठा फाऊंडेशन सांगली च्या वतिने देण्यात येणारा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.हे दोन्ही पुरस्कार मिळवल्याबद्दल ज्ञानोबा मुंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

🔸विभागीय अध्यक्षपदी निवड

या पुरस्कार वितरण कार्यक्रमात बहुभाषीक संत भाऊ बाबा वंजारी सेवा संघ संस्थापिका सौ.लक्ष्मी गरकळ यांनी ज्ञानोबा मुंडे यांची विभागीय अध्यक्षपदी निवड केली असुन संस्थेचे विचार जनसामान्यांपर्यंत पोंहचविण्याचे ध्येय ठेवुन आपण संस्थेचे कार्य करावे असे या नियुक्तीपत्रात नमुद करण्यात आले आहे.