महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेची धुळे जिल्हा कार्यकारणी निवड

26

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

नेर(दि.3मार्च):-महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेची धुळे जिल्हा कार्यकारणी निवड बाबत बाळकृष्ण मंगल कार्यालय धुळे येथे कोरोना बाबत सर्व नियमांचे पालन करून विशेष सभा पार पडली यात लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडत जिल्हाअध्यक्ष- सी यु पाटील, कार्याध्यक्ष- एम व्ही गोसावी, सरचिटणीस एस एस पाटील, शिरपूर उपविभाग उपाध्यक्ष-ए आर राजपूत, धुळे उपविभाग उपाध्यक्ष – यु के पावरा, लेखापरीक्षक -आर ए साळुंके, सहाय्यक लेखा परीक्षक एस टी कदम,खजिनदार -विजय बावा,जिल्हा संघटक – पी एन गावित,सहसचिव- एम एस अहिरराव,महिला संघटक- श्रीमती अनिता भामरे, हिशोबनीस- आर एन सोनार, कार्यकारी सदस्य- आर पी कुमावत,महिला सदस्य सचिव- श्रीमती छाया काळे,स्वीकृत सदस्य-श्रीमती मनीषा ठाकरे ज्येष्ठ मार्गदर्शक – एन वाय कुलकर्णी यांच्यासह सन 2021 ते 2025 या कालावधी करिता धुळे जिल्हा तलाठी संघटनेची कार्यकारिणी निवड करण्यात आली व सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक निरिक्षक म्हणून एस बी मोहिते निवडणूक निर्णय अधिकारी एन वाय कुलकर्णी (माजी जिल्हाध्यक्ष)यांनी कामकाज पाहिले व आर बी राजपूत ए ए भामरे,विजू पाटील,राजेंद्र सोनार,एस.बी. सूर्यवंशी,महेंद्र पाटील, डी आर चौधरी,मनोहर बी.पाटील, एस बी गोसावी,राकेश साळुंके,जे.एस.बांगर,दत्ता लहामगे यांच्यासह धुळे शिरपूर शिंदखेडा व साक्रीचे तलाठी संघटनेचे तालुका अध्यक्ष व चिटणीस व मागील जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय तलाठी व मंडळ अधिकारी सभासदांची उपस्थिती होती