विकृत जातीयवादी मानसिकतेच्या चष्म्यातून बघणाऱ्या नागभीड नगरपरिषदेचा जाहीर निषेध

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

नागभीड(दि.3मार्च):-विकृत जातीयवादी मानसिकतेच्या चष्म्यातून बघणाऱ्या नागभीड नगरपरिषदेचा जाहीर निषेध करणारे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने नागभीड नगर परिषद प्रशासनाला सादर करण्यात आले.
नागभीड विकासाचा पोबारा वाजवणाऱ्या भ्रष्ट नगरपरिषदेनी नुकत्याच जाहीर केलेल्या *कॅलेंडर 2021* मध्ये सर्व उत्सवाचे उल्लेख केलीत माञ ज्यांनी *अखंड भारत देशाचा राज्यकारभार चालविण्यासाठी 2 वर्ष 11 महीने 18 दिवस अहो रात्र परिश्रम करून ‘भारतीय संविधान’ निर्माण केले, त्या जगात पहिल्या नंबरचा विद्वान म्हणून “सिम्बाल आॅफ नॉलेज” ओळख असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे जंयती व महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख नाही. छायाचित्र नाही* ही लाजिरवाणी बाब आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस *’संविधान दिन’* म्हणून संपूर्ण भारतामध्ये सार्वजनिक स्तरावर शासकीय, निमशासकीय, शाळा, कॉलेज, इतर कार्यालयात साजरा केला जातो त्याचा उल्लेख मुळीच केलेला नाही अशा या बुद्धीपुरस्सर केलेल्या कृत्यावरून नगरपरिषद प्रशासनाची, पदाधिकाऱ्याची विकृत जातीयवादी मानसिकता स्पष्ट दिसून येत आहे. अशा जातीयवादी मानसिकतेचा जाहीर निषेध निवेदनातून करण्यात आला.

ज्या डॉ बाबासाहब आंबेडकरांनी ‘जाती तोडो समाज जोडो’ नारा देऊन अठरापगड जातीला एकसुत्रात आणून 340, 341, 342 कलमान्वये लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व दिले, या देशातल्या तमाम कष्टकरी शोषीत, पिडीत जनतेला हक्क अधिकार मिळवून दिले. समान संधी दिली. आणि मतदानाचा अधिकार दिला त्या मतदानामुळे पदावर पोहचलेत त्या बापाला विसरलात म्हणजेच तुम्हची मानसिकता हि किती निच, विकृत दर्जाची आहे हे सिद्ध होते. *गेल्या 3-4 वर्षापासून रमाई आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केले मात्र त्याचां थांगपत्ता लागलेला नाही. फाईल गहाळ केल्या. विचारणा केली असता कार्यवाही सुरु आहे असे सांगितले जाते परंतु त्याला नेस्तनाबूत करुन संपविणे हा प्रकार जातीयवादी मानसिकतेचा चष्म्यातून बघितल्याचे दिसत आहे.

जो अधिकारी, पदाधिकारी महापुरूषांचा सम्मान करू इच्छितो नाही, ज्यानी इतिहास घडविला त्याचा इतिहास पुसन्याच्या नादात लागतो, जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यास असफल ठरतो त्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. अशाप्रकारचे नगर परिषदेनी समाजात विषमता, भेदभाव करण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला देण्यात आला.
अशा या कृत्याचा प्रहार जनशक्ती पक्ष वतीने आमची मागणी आहे कि नगरपरिषद प्रशासनानी चुकीबद्दल जाहिर माफि मागावी व वितरित केलेले कॅलेंडर वापस घेऊन पुनश्च कॅलेंडरमध्ये दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.निवेदन सादर करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे वृषभ खापर्डे रोहीत कुमरे, दिपक मानुसमारे रोहित चौधरी, शेकर फटीग, अक्षय खोब्रागडे, निलेश डोमडे,राहुल दडमल, विकी फुलवानी व अन्य प्रहार सेवक उपस्थित होते.