शेतकऱ्यासाठी केंद्र व राज्य सरकारने नुकसान भरपाईचा कायदा दुरुस्त करा- वसंत मुंडे

27

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.3मार्च):-बोगस बियाणे संदर्भात केंद्र सरकारने कायदा दुरुस्त करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे निवेदन द्वारे दिल्ली येथे केली आहे. महाराष्ट्र मध्ये खरीप 2020 ला अनेक शेतकऱ्याचे सोयाबीन बियाणे न उगवल्या मुळे दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांपुढे उभे राहिले, त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांच्या तक्रारीवरून 23/ 6 /2020 ला पथक नेमून महाराष्ट्रात पंचनामे करण्यास सुरुवात केली .महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी 1 लाख 61 हजार तक्रारी बोगस बियाणे संदर्भात कृषी खात्याकडे दाखल केल्या त्यावर सर्व शेतकऱ्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले .निकृष्ट बियाणे सोयाबीनचे न उगवल्या मुळे शेतकऱ्याला दुबार पेरणी करण्याचे संकट मोठे उभा राहिले. परंतु कायद्यातच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद नसल्यामुळे आजतागायत अनेक वेळा पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.

उलट महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारकडून जिल्हा ग्राहक मंच यामध्ये शेतकऱ्याने तक्रार दाखल करावी व न्यायालयात नुकसानभरपाईचा दावा दाखल करावा असे सूचना देण्यात आल्या परंतु शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची तरतूद कायद्यात नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला . राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केल्या व जिल्हा न्यायालयाकडे अपील दाखल केले त्यांचे निकाल शेतकऱ्याच्या बाजून लागली तरीही बी बियाणे पुरवणाऱ्या कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास तयार नाहीत राज्य सरकारकडे चौकशी केली तर कायद्यामध्ये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी तरतूद नाही असे उत्तर दिले जाते.

त्यामुळे राज्य सरकारने हा कायदा दुरुस्त करण्यासंदर्भात कायदा करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी शिफारस करावी व शेतकऱ्याचे दुबार पेरणी च्या संकटात आर्थिक मदत करण्याची विनंती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी निवेदनाद्वारे केली. ज्या कंपन्यांनी खते, बी-बियाणे, औषधी बोगस पुरवले आहेत. त्यांचे लायसन महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाला आदेश देऊन रद्द करण्यासंदर्भात कारवाई करावी अशी मागणी कॉंग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केंद्र व राज्य सरकारला केली आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना बोगस बियाणे पुरवलेल्या कंपन्या वर कारवाई केली जात नाही व शेतकरी नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत केंद्र व राज्य सरकारकडे कारवाईसाठी पाठपुरावा करणार असे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी सांगितले आहे .