सावधान! सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच गुन्हा दाखल

27

🔹बेकायदेशीर जमाव जमवल्या प्रकरणात गुन्हा दाखल

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.4मार्च):-वेळापूर ता माळशिरस पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक जाधव,पोलीस नाईक विनोद साठे यांचे सह 7 व इतर 20 ते 25 लोकांवर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी वेळापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान १८६० चे १४३,१८८,२६९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यात सह पोलीस प्रशासनात खळबळ उडालेली आहे. याबाबतची हकिकत अशी की, दि.०२ मार्च रोजी संध्याकाळी ७.३० ते ९.०० या वेळेत संत ज्ञानेश्वर महाराज चौकातील पालखी मैदान,वेळापूर येथे पोलीस नाईक विनोद साठे व त्यांचे हितसंबंधी मित्रांनी मोठ्या स्वरूपात वाढदिवस साजरा केला.

असून मा.जिल्हाधिकारी सो सोलापूर यांचे जमावबंदी आदेशाचे तसेच कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करून त्यांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून विनामास्क व सोशल डिस्टन्स न पाळता वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करून डीजे लावून त्यासमोर नाचून त्यांनी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढविण्याची हयगयीची कृती केली अशा आशयाची फिर्याद पोलिस. काॅन्स्टेबल. महेश पोरे यांनी दिली आहे.अधिक तपास वेळापूर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे करीत आहेत.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे अशा वेळी शासनाने वेळोवेळी पारित केलेल्या नियमांचे सर्वांनीच पालन करावे, गर्दी करणे टाळावे , मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा नियमांचं उल्लंघन करणार्‍यांविरोधात उचित व योग्य कारवाई केली जाईल कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही यामुळे सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन वेळापूर पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांनी केले.