खडसंगी परिसरात महसुल व वनाधिकाऱ्यांना हाताशी धरून रेती माफियांची अवैद्य रेती तस्करी

31

🔹आरक्षित मुरपार जंगलातून लाखो ब्रास रेतीची लूट

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.4मार्च)- तालुक्यातील खडसंगी येथील महसुल आणि वनाधिकाऱ्याशी हाताशी धरून खडसंगी परिसरात मागील काही दिवसापासून अवैद्य रेती तस्करी केल्या जात आहे. मात्र यावर कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांकडून कार्यवाही केल्या जात नसून महसुल व वनाधिकाऱ्यावरच प्रश्न चिंन्ह निर्माण झाले आहे.

खडसंगी येथे प्रत्येक वनाधिकाऱ्याचे दालन आहेत. त्यामध्ये एफ.डी.सी.एम, चे कार्यालय, ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे कार्यालय, बफर झोन कार्यालय, तलाठी कार्यालय अशा अनेक प्रकारचे अधिकारी नियमित असून सुद्धा खडसंगी येथे मुरपार येथील ब्रह्मपुरी प्रादेशिक आरक्षित जंगलातून लाखो ब्रास रेती तस्कर ट्रॅक्टर ने रात्री तस्करी करीत असून यावर महसूल विभागाचे अधिकारी कोणतीही कार्यवाही न करता आशीर्वाद देऊन रेती तस्करी होत आहे.

आरक्षित जंगलातील वन संपत्तीच्या सरक्षनासाठी महसूल आणि वनाधिकार्यांना गस्त करण्यासाठी शासनाने चारचाकी दिली असून तीचा सुद्धा उपयोग करण्यात येत नाही. भर दिवसा रेती तस्करी होत असून सर्व अधिकारी का बर! मुंग गिळून बसलेत हाच मोठा प्रश्न आहे. मुरपार जंगलातील अवैध रेती तस्करीला लवकरात लवकर आळा घालावा.आणि संबंधित अधिकाऱ्यांनी गस्त घालावी अशी मागणी ग्रामवासी करीत आहे.