भेंडाळा – मुरखडा जिल्हा परीषद क्षेत्रांतील नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचे सत्कार

33

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

चामोर्शी(दि.4मार्च):-भेंडाळा – मुरखडा जिल्हा परीषद क्षेत्रांतील नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचे सत्कार डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली यांच्या हस्ते करण्यात आले.

चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा – मुरखडा जिल्हा परीषद क्षेत्रांतील ग्रामपंचायत भेंडाळा, घारगाव, दोटकुली (खंडाळा), वेलतुर ( तुकुम), कळमगाव (एकोडी), सगणापुर, कान्होली या ग्रामपंचायतीमध्ये भेट घेऊन ग्रामपंचायतीतील नवनियुक्त सरपंच व उपसरपंच पदी निवड झालेल्या या नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचे डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोद खोबे, माजी प.स सदस्य प्रमोद भगत, कालिदास बुरांडे जिल्हा महासचिव काँग्रेस कमिटी गडचिरोली, लीलाधर सुरजागडे जिल्हा सचिव काँग्रेस कमिटी गडचिरोली तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व पुरुष वर्ग उपस्थित होते.

घारगाव ग्रामपंचायत मधून सरपंच विवेक भगत उप सरपंच कबीर आभारे, सगणापुर ग्रामपंचायत मधून रेवती पोरटे उप सरपंच पार्वाताबाई कन्नाके, वेलतुर (तुकुम) ग्रामपंचायत मधून सरपंच संध्या नायगमकार उप सरपंच दिगंबर धानोरकर, दोटकुली (खंडाळा) ग्रामपंचायत मधून जया सातपुते उप सरपंच संदीप सातपुते, कळमगाव (एकोडी) ग्रामपंचायत मधून उषा सयाम उप सरपंच गिरेश धोटे, भेंडाळा ग्रामपंचायत सरपंच कुंदा जुआरे, सदस्य निखील उंदिरवाडे, ग्रामपंचायत कान्होली उपसरपंच प्रितम देशमुख या नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आले.

या सर्व ग्रामपंचायतीतील सरपंच व उपसरपंच यांची भेट घेऊन सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्य यांची बैठक घेऊन चर्चेतून मार्गदर्शन केले. तसेच विविध प्रकारचे समस्यां सांगुन गावकऱ्यांनी डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली यांना निवेदन दिले.