कोरोना लसीकरणासाठी व्याधीग्रस्तांना प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक – अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.4मार्च):-कोरोना लसीकरणाच्या तीसऱ्या टप्प्यात 45 ते 60 वर्ष वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांना विहित प्रमाणपत्र नसल्यास लसीकरण केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी लसीकरण नाकारू शकतात, त्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्याकरिता कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळाल्यावर संबंधीत लसीकरण केंद्रावर केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे विहित नमुन्यातील नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी आज कोरोना टास्क समितीच्या बैठकीत सांगितले.कोरोना टास्क समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीसकलमी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्यचिमित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सुरपाम, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम, प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी वरखेडकर यांनी जिल्ह्यात दैनंदिन कोरोना तपासणीची संख्या 1200 ते 1500 पर्यंत वाढविण्याचे तसेच कोरोना बांधीतांच्या संपर्कातील नागरिकांच्या शोधमोहिमेत प्रगती आवश्यक असल्याचे सांगितले. याशिवाय कोविड केअर सेंटरसाठी यापुर्वी अधिग्रहीत केलेली वसतीगृहे व शाळा आता उपलब्ध नसल्याने पर्यायी व्यवस्था करण्याचे तसेच वैद्यकीय सेवक कमी पडत असल्यास कंत्राटी तत्वावरील मनुष्यबळ वाढविण्याचे व महानगरपालीका क्षेत्रात लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले. वरखेडकर यांनी कोरोनावरील औषधी व लस साठा पुरेशा प्रमाणात असल्याची संबंधीतांकडू खात्री करून घेतली. मास्क नाही तर प्रवेश नाही मोहिम, सिरो सर्व्हे, गृह विलगीकरण आदिबाबतही त्यांनी आढावा घेवून आरोग्य यंत्रणेला आवश्यक निर्देश दिले.
यावेळी महानगरपालीकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश साठे, डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. गणेश धोटे, डॉ. प्रतिक बोरकर व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.