टेभूर्णी येथील खंडोबा अमाईन्सच्या घाण पाण्याने लोकांचे आरोग्य धोक्यात

25

🔸टेभूर्णी -केम रस्त्याचा प्रश्नही एेरणीवर

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

टेभूर्णी(दि.5मार्च):- औद्योगिक वसाहतीमधील खंडोबा अमाईन्स या कंपनीमध्ये माॅलेसियसपासून इथेनॉल तयार केले जाते. तयार इथेनॉल मधून जे घाण पाणी निघते त्याला पेंट वाॅश म्हणतात. हे पेंट वाॅशचे घाण पाणी आसपासच्या उपळवटे,दहिवली ,सातोली,कन्हेरगाव या गावांमध्ये टॅंकरच्या सहाय्याने सोडले जाते . या पाण्याचा वास इतका उग्र आहे, की तो टॅकर रस्त्याने जरी चालला तरी त्या पाण्याच्या वासाने नाक बंद करावे लागत आहे, हे असले घाण पाणी गावांच्या पडिक जमिनीवर सोडले जात आहे, सोडलेल्या पाण्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सध्या कोरोनाची दुसरी लाट येईल अशी भीती असताना या पेंट वाॅशच्या पाण्यामुळे दुसर्या एखाद्या साथीच्या रोगाची सुरुवात तरी होणार नाही ना अशी चिंता ग्रामस्थांमध्ये आहे.
ज्या टँकरद्वारे या घाण पाण्याची वाहतूक केली जाते, ते टॅंकर ओव्हरलोड वाहतूक करतात. त्यामुळे एका वर्षापूर्वीच तयार झालेला रस्ता पुर्णपणे खराब होत आहे. आधीच ग्रामीण भागातील रस्ते वर्षानुवर्षे होत नाहीत त्यात या टँकरच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्ते खराब होत असल्यामुळे हे टॅंकर वाहतूक बंद झाली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.