स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पेट्रो ल डिझेल व गॅस च्या दरवाढीच्या निषेधार्थ सायकल मोर्चा

26

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.5मार्च):-महाराष्ट्र राज्यात पेट्रोल डिझेल व गॅस याच्या किंमती भरमसाठ वाढल्या त्या मुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे त्या मुळे वाढलेले दर त्वरित कमी करा व गॅसचे जे अनुदान बंद आहे ते त्वरीत ग्राहकाच्या खात्यावर जमा करा या मागणीसाठी पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे याच्या नेतृत्वाखाली येवला शहरातील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सायकल व हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या दिशेने वळला तिथे जोरदार घोषणा बाजी करून महेंद्रभाऊ पगारे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की कोरोना चा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन आम्ही फक्त थोडक्या कार्यकर्ते येऊन निवेदन देत आहेत जर निवेदनाची दखल घेतली नाही तर पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा महेंद्रभाऊ पगारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला व नायब तहसीलदार प्रकाश बुरूगळे यांना निवेदन सादर केले.

यावेळी पक्षाचे ता.कार्याध्यक्ष विजय घोडेराव ता.उपाध्यक्ष बाळासाहेब आहिरे ता.कोषाध्यक्ष महेंद्र खळे युवा नेते गणेशभाऊ जाधव युवा नेते विजुनाना पगारे विनोद त्रिभुवन समाधान गुंजाळ भीमराव खळे श्रीधर आहिरे सतीश खळे नाना पिपळे राजेंद्र पगारे रोहन रणधीर संजय पगारे बाळासाहेब सोनवणे विरेश सोनवणे युवराज पगारे यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.