इयत्ता ६वी ते ८वी च्या वर्गावरील पदवीधर शिक्षकांसाठी शिक्षणमंत्र्यांची वेतनश्रेणी लागू करण्याची घोषणा

30

🔸आमदार कपिल पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला प्रश्न

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.5 मार्च)-बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रीय शिक्षण परिषदेने उच्च प्राथमिक म्हणजेच सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवणा-या शिक्षकांच्या पात्रतेमध्ये बदल केला आहे.

त्यानुसार शासनाने १३ अॉक्टोबर २०१६ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार शिक्षकांंना वेतनश्रेणी लागू करावी अशा सुचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आल्या आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील प्राथमिक पदवीधर शिक्षक व विशेष शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या विधानपरिषदेत बोलत होत्या.यासंदर्भात आमदार कपिल पाटील यांच्यासमवेत लवकरच बैठक आयोजित करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

पदवीधर व विशेष शिक्षकांना वेतनश्रेणी मिळावी याकरिता आमदार कपिल पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे शिक्षक भारती नागपूर विभागीय सचिव तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे, विभागीय उपाध्यक्ष रविंद्र उरकुडे, जब्बार शेख, राजाराम घोडके, धनराज गेडाम, रावन शेरकुरे, दिवाकर लखमापुरे, नंदकिशोर शेरकी, विलास फलके, कैलाश बोरकर, राजेश धोंगडे, विजय मिटपल्लीवार आदींनी आभार मानले आहे.