काँलम नं. १३ मध्ये जातीची नोंद ST- 2 अशी बॉलपेनने झाल्याची खात्री केल्याशिवाय सही करू नये

35

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.5मार्च):-वर्षभरापासून सुरु असलेल्या जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा, विद्यालय, महाविद्यालये, आस्थापने बंद होते. कोरोना काळात बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्थलांतरण झाल्यामुळे नुकतेच महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांचे जातीनिहाय सर्वे 1 मार्च ते 10 मार्च दरम्यान गावपातळीवर करण्यात येत आहे.प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षक सर्वे करत आहेत. सदर जातीनिहाय सर्वेच्या फॉर्ममध्ये काँलम नं.13 मध्ये ST – 2 (टोकरे कोळी) अशी नोंद करावी.

भारतीय राज्यघटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये 28 क्रमांकावर टोकरे कोळी समाजाचा उल्लेख असून इतर प्रवर्गात न मोडता सर्व्हेसाठी दिलेल्या यादीतील जातीनिहाय रकान्यात अनुसूचित जमातीचा (ST-2) उल्लेख करावा असे भैय्यासाहेब कोळी (खांदेश विभाग अध्यक्ष, टोकरे कोळी युवा मंच) यांनी शिरपूर तालुक्यातील सूर्यवंशी मॅडम वरूळ, ठाकरे सर जुने भामपूर, पाटील मॅडम तऱ्हाड कसबे, वाडीले सर भटाने, पाटील सर लोंढरे, नेरकर सर नवे भामपूर आदी सर्वे करणाऱ्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांना सांगितले. सोबत विकास कोळी (सामाजिक कार्यकर्ते, भामपूर), गणेश कोळी, संजय जाधव उपस्थित होते.सोबत जनगणनेचा नमूना आहे. काँलम नं. १३ मध्ये *ST- 2* असे नोंदववीले जाईल हे प्रत्यकाने पाहून खात्री करणे व ही नोंद बाँलपेननेच केलेली आहे का हेही पहावे.