प्रहार वाहन चालक मालक संघटनेने केले नेरी – सीरपुर रोडवर भव्य आंदोलन

34

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नेरी(दि.6मार्च):-सीरपुर रोडचे काम गेल्या १ ते दीड महिन्यापासून अतीशय कासव गतीने काम चालू आहे १ तर नियमानुसार १ बाजुने खोदुन २ ऱ्या बाजुने काम चालू ठेवायला पाहिजे . मात्र अस न होता संपुर्ण रोड फोडुन मोठी गीट्टी टाकुन कंपनी झोपेत आहे . वाहन – चालक यांना प्रचंड ड्रायव्हिंग करतांना खुप त्रास सहन करावा लागत आहे . प्रचंड वाहन मालकांची आजपर्यंत खुप मोठी नुकसान झाली आहे. टायर फुटणे ,गाडी ब्रेक डाऊन होणे ,नेरी सीरपुर आजुबाजूच्या परीसरातील नागरीकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे . आजपर्यंत कित्येक अपघात झाले आहे . कित्येक नागरीक अपंगत्व आले आहेत . तर कित्येक शेतकरी बांधव बैल लंगळे होतात म्हणून आपल्या शेतात जाने सोडले आहेत.

बरेच शेतकऱ्यांंचे रोडच्या बाजुला असलेल्या धुळ माती मुळे पिकांची नुकसान झाली आहे . याकडे कुठल्याही लोक प्रतिनिधींचे लक्ष नाहीत . करीता या त्या झोपलेल्या स्वास्तीनो आयसीसी कंपनीला जागे करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष प्रेरीत प्रहार वाहन चालक मालक संघटना शाखा नेरी परिसराच्या वतीने ५/३/२०२१ रोज शुक्रवारला आयसीसी स्वास्तीनो कंपनी च्या मशीन गाड्यांना घेराव घालुन प्रहार संघटने मार्फत ठिय्या आंदोलन केले . ठेकेदार यांना घाम फोडला आणी आंदोलन सफल झाले.

संघटनेच्या मुख्य मागण्या
१) तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे वाहन चालक मालकांची नुकसान भरपाई
२ )आजुबाजूच्या शेतकरी बांधवांची धुळ माती मुळे झालेली पिकांची नुकसान भरपाई
३) रोडनी झालेल्या अपघातात अपंगत्व झालेल्या नागरीकांना ताबडतोब मदत करने
४) तसेच या कंपनीच्या लेबर मजुरांना २ महिन्यापासून पगार नाहीत १ महीना झाला ते खाली बसले आहेत त्यांचे जेवनाचे प्रॉब्लेम आहे त्यांना त्यांच्या मेहनती चे पैसे देणे
गाड्यांना घेराव घालताच कंपनीचे इंजीनीअर , ठेकेदार हे आंदोनकर्त्याला भेटायला आले कंपनीचे वरीष्ठ अधीकारी यांच्याशी चर्चा करुन रोज २ वेळ रोडवर पानी मारने ४ कि.मी. चा रस्ता वर गीट्टी टाकली आहे.

ते काम १४ तारखेच्या आत करुन देऊ, अपघातात अपंगत्व झालेल्या कुटुंबांची भेट घेऊ,पुढे चालू असलेल्या कामे ही १ बाजुने वाहतूक व एक बाजुने काम चालू ठेऊ असे लेखी दीली व आंदोलन मागे घेण्यात आले .बोललेले शब्द जर पुर्ण न केल्यास प्रहार संघटनेमार्फत १४ तारखेनंतर जनाक्रोश आंदोलन केले जाईल असा इशारा ही दीला आहे .आंदोलनाच्या वेळी रीशी कुंवर नागपूर महाराष्ट्र सचीव प्रहार वाहन चालक संघटना नेरी शहरातील प्रहार सेवक प्रवीण वाघे, सचिन वाघे, नंदु नीकोडे, संजय दडमल,हरजीत सींग भौड,दरया वाघमारे, प्रवीण बोरसरे, मुन्ना बनसोड, सुमीत दंडारे, आशीष कामडी, बजरंग, विपीन कामडी, अनील चाफले अक्षय कामडी किशोर पिसे शुभम मोरे , आदी उपस्थित होते.