नाशिकची वाटचाल लाकडावूनच्या दिशेने- जिल्हाधकाऱ्यांनी दिला हा गंभीर इशारा

34

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.7मार्च):- शहरासह जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असून याची गंभीर दखल जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतली आहे.सतत असे बाधित वाढत राहिले तर लॉकडाऊन लावावा लागेल अशीच स्थिती असल्याचे स्पष्ट होत आहे.जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे की,रुग्ण संख्या वाढत चालली आहे आणि त्याचबरोबर लोकांकडून कोरोना संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.व्यक्तिगत कारवाया करून या गोष्टींना आळा घालणे अत्यंत अवघड असल्याने अशीच परिस्थिती सुरू राहिली तर निश्चितच काही निर्बंधांचा विचार करावा लागेल.

आजपर्यंत करोडो रुपये दंड केले आहेत परंतु त्याने काहीही फरक पडलेला नाही.आपण कोरोनाचे संकट वाढवून लॉकडाऊनचे संकट ओढवून घेत आहोत.त्यामुळे टप्प्याटप्प्याने निर्बंध कठोर करणे हा एक पर्याय आहे किंवा थेट लॉक डाऊन करणे हे दोन पर्याय आहेत. परिस्थिती सुधारते की बिघडते यावर ते आहे,असेही मांढरे यांनी स्पष्ट केले