आ.राजेश पवारांनी मराठा आरक्षणासाठी काय केले?- राजेश मोरे

49

✒️उमरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उमरी(दि.7मार्च):- नायगांव विधानसभा मतदारसंघांचे सेल्फी स्टार आमदार राजेश पवार यांनी अवैध वाळ उपश्याविरोधात पाच तास उपोषण केले. याची चर्चा सोशल मिडीयावर चांगलीच रंगली आहे.. पण राजेश पवार यांनी मराठा आरक्षणासाठी काय केले असा सवाल छावा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे यांनी केला आहे.आमदार राजेश पवार यांनी जाहीराती व पोश्टर बाजीच्या जिवावर आपली ओळख निर्माण केली, व 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अवैध रित्या रित्या आपल्या संपंत्ती च्या जोरावर निवडुन आले.

निवडुण आल्यापासून ह्या आमदार महोदयांनी विरोधात स्वतःच्या विरोधात बोलणार्या लोकांवर पोलीस गुन्हे दाखल केले. तर आता हे आमदार महोदय वाळू उपश्याविरोधात चांगलेच पेटलेत.काहि दिवसापूर्वी तर वाळू उपश्यानेच मतदार संघातील रस्ते खराब होत आहेत अस सुद्धा सांगितले तर दुसरीकडे हेच आमदार घरकुल लाभार्थ्यांना वाळू द्या अशी मागणी करत आहेत. नेमकं आमदार फक्त आपली प्रसिद्धी करण्याच्या मार्गावर आहेत का हेच कळत नाही.

आमदारांनी वाळू उपश्या विरोधात आवाज उठवला ही चांगली बाब आहे परंतु आमदार राजेश पवार हे स्वतः मराठा या जातीचे असुन त्यांना याचा विसर पडला का….? त्यांनी मराठा आरक्षण मिळावे म्हणून विरोधी पक्षांकडून विधान भवनात नेमकी कोणती पावले उचलली असा प्रश्न छावा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला.

आमदार राजेश पवार हे मराठा क्रांती मोर्चा मध्ये तर प्रत्यक्षपणे सहभागी दिसलेच नाहीत. पण ज्यावेळी उमरी येथील मराठा क्रांती मोर्चा मध्ये त्यांच्याच पक्षाचे तत्कालीन तालुका उपाध्यक्ष व तालुका सरचिटणीस यांच्यावर गुन्हा दाखल झाला तेंव्हा सुद्धा मि अमेरिकेत आहे असे उडवाउडवीची उत्तरे राजेश पवार यांनी दिली. व नंतर फोन स्विच ऑफ करुन ठेवला. तर दुसरीकडे हेच महोदय तुमच्या अडचणीच्या काळात एक काॅल करा मि तुमची मदत करेल अस सांगतात हिच आहे का यांची मदत असंही राजेश मोरे यावेळी म्हणाले