तलवाडा येथील पुरातन दैवत म्हसुबाचे सरपंच व उप सरपंच यांनी केले सुशोभीकरण

26

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)मो:-9767177932

तलवाडा(दि.8मार्च):- गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे वेळो वेळी सातत्याने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन पाहन्यास मिळते. तलवाडा या ठिकाणी ग्राम पंचायतच्या लगट शुल्लक आसे विवादित आसलेले पुरातन दैवत म्हसुबाचे नियोजित स्थान असुन ते गेली कितेक वर्ष अतिक्रमणच्या विळाख्यात खितपत अवस्थेत दिसुन येत होते. नेहमिच सामाजिक सलोखा अबाधित ठेवन्यात तलवाडा गाव आग्रेसर आसल्याने या कडे फारसे कुणी लक्ष्य देत नव्हते.

परंतु तलवाडा या ठिकाणी सामाजिक सलोख्याचे नेहमिच भान जपनारे नवनियुक्त ऊप सरपंच श्री आक्रम (आज्जुभाई) सौदागर, तलवाडा येथील वारकरी संप्रदायाचे प्रवक्ता व नव नियुक्त ग्राम पंचायत सदस्य ह. भ.प. गणेश महाराज कचरे. तलवाडा गावचे नव निर्वाचित सरपंच विष्णु तात्या हात्ते यांनी पुढाकार घेत संत गाडगे बाबा यांचा वसा स्वच्छ गाव सुंदर गाव हा संकल्प हाती घेऊन या म्हसुबा देवस्थानचे शुशोभिकरण घडऊन आनले असुन लवकरच या ठिकाणी गावकरी व सर्व समाज बांधवांच्या सहर्कायाने शुशोभित आसे छोटेखानी मंदिर बांधन्यात येईल आसा मनोदय उप सरपंच आक्रम (आज्जुभाई) सौदागर, ग्राम पंचायत सदस्य ह.भ.प. गणेश महाराज कचरे. सरपंच विष्णु तात्या हात्ते यांनी व्येक्त केला आहे.