पुस्तकांशी मैत्री व दिवसभराचे व्यवस्थापन केल्यास प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा- RFO ब्राह्मणे मॅडम

25

🔸ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान येथे “जागतिक महिला दिन” साजरा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.8मार्च):-ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान ता. ब्रम्हपुरी येथे “जागतिक महिला दिन” साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. ब्राह्मणे मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) ब्रम्हपुरी, कॉलेज चे प्राचार्य मा. मैंद सर, संस्थेचे अध्यक्ष मा. निहाटे सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन करून स्वागत गीताने झाली.

मा. ब्राह्मणे मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) ब्रम्हपुरी, यांनी मुलांना प्रशासकीय सेवेत जायचे असेल तर बी. ए. सिव्हिल सर्व्हिसेस अभ्यासक्रम पूरक आहे. स्वतःचे उदाहरण देऊन गरीब परिस्थीवर मात करता येते कमवा आणि शिका, पुस्तकांशी मैत्री करा. आणि सकाळी उठून दिवसभराचे व्यवस्थापन करा, जीवनात तेच यशस्वी होतात जे वेळेचे योग्य नियोजन करतात, असे प्रतिपादन मा. ब्राह्मणे मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) ब्रम्हपुरी, यांनी केले.

कार्यक्रमाला उपस्थित मा. प्राचार्य मैंद सर, प्रा. प्रधान मॅडम, प्रा. मैंद मॅडम, प्रा. दोनाडकर सर, प्रा. बांगरे सर, प्रा. चौधरी सर, विडिओ व्हॅलन्टियर कृपाकर चहांदे इ. प्रमुख पाहुण्यांनी जागतिक महिला दिनावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे स्वागत गीत काजल भोयर, अस्मिता उरकुडे, अश्विनी निकेसर, स्वाती सरोते व कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी रविना बुल्ले, प्रास्ताविक अस्मिता लेनगुरे आणि आभार स्वाती सोरते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. लिंगायत जी, बुराडे बाई यांनी मोलाचे सहकार्य केले.