देवळा येथील दुय्यम निबंधक अखेर निलंबित

24

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नासिक(दि.8मार्च):- जिल्ह्यातील तालुका देवळा येथे बनावट दस्त चा सत्य प्रत करून देणारे तात्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगुर्डे यांना नासिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी निलंबित केले असून त्यांच्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांना दिले आहेत आठ फेब्रुवारी एकच नंबर चे 2 मुद्रांक असल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांना दिले होते.

त्यानंतर देवळा दुय्यम निबंधक कार्यालयाची त्रिसदस्यीय पथकाद्वारे चौकशी करण्यात आली तसेच तपास कामात अडथळा येऊ नये म्हणून 9 फेब्रुवारीलाच दुय्यम निबंधक काचा पदभार काढून घेण्यात आला होता चौकशी पथकाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्थापित केली होती आता अखेर बनवत दस्ताची सत्यप्रत करून देणारे तात्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगुर्डे यांना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी निलंबित केले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांना दिला आहे