पोलिस स्टेशन आष्टीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा विविध उपक्रमांचे आयोजन

32

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

आष्टी(दि.9मार्च):-दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पोलिस स्टेशन आष्टीच्या वतीने भव्य महीला जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.व त्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा आष्टी येथील विद्यार्थ्यांनी समुह नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच शहीद पोलिस कर्मचाऱ्यांच्या पत्निंचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला.तसेच आष्टी पोलिस स्टेशन अंतर्गत महीला पोलिस पाटलांचा सत्कार करण्यात आला.

व आष्टी येथील कर्तूत्ववान महीला डॉ युगश्री डोर्लीकर,कु सुनंदा गलबले मुख्याध्यापिका , सौ अर्चना निमसरकार व्यावसायिक ,सौ साधना मडावी ब्युटीपार्लर व्यावसायिक,तिरुपताताई पोलिस स्टेशन आष्टी,यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.व आष्टी येथील विधवा महिला नलीनी तलांडे,वच्छला वाघाडे, रंजना ठाकुर, बेबीताई झाडे, वंदना अवथरे, माधुरी गाथाडे ,यांचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला.रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.व संगित खुर्ची, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कु दिया रविंद्र नागुलवार, महात्मा फुले हॉ. आष्टी, तेजस्विनी श्रीधर राऊत,आचलं रमेश मडावी,अश्विनी कस्तुरे ईयत्ता १२ वी सोनल कमलाकर राऊत श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टी,प्राची भाऊराव अवथरे,राजे धर्मराव हायस्कूल आष्टी, अंकीता नामदेव दयालवार,सिमरण सुनिल निमसरकार, या १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांनिंचा सत्कार करण्यात आला.

या वेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सौ रूपालीताई संजय पंदीलवार जिल्हा परिषद सदस्य,सौ बेबीताई बुरांडे सरपंच ग्रामपंचायत आष्टी, वैशाली कांबळे पोलिस स्टेशन आष्टी,डॉ रक्षा बुर्लावार, नंदाताई डोर्लीकर, सुनंदा गलबले मुख्याध्यापिका, सामाजिक कार्यकर्ते वर्षाताई कलाक्षपवार,अर्चना निमसरकार भोसले मॅडम, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्राचे सुत्रसंचलन रमा मॅडम पोलिस स्टेशन आष्टी यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली कांबळे पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन आष्टी यांनी केले या वेळी परीसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.