नारायणगाव खेरवाडी येथे जागतिक महिला दिन

36

✒️निफाड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

निफाड(दि.9मार्च):- तालुक्यातील नावाजलेले गाव नारायणगाव खेरवाडी येथील शिवसेनेच्या नवनिर्वाचित सरपंच अश्विनी दीपक जाधव व उपसरपंच विजय रामचंद्र लांडगे व ग्रामपालिका सदस्य यांच्या वतीने ग्रामपालिका हॉलमध्ये ग्रामपालिका हॉल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी पंचायत समितीच्या सभापती रत्नाताई संगमनेरे ह्या होत्या प्रथम स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.

यावेळी सरपंच आश्विनी जाधव यांनी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपले मनोगत करत असताना सांगितले की महिला सक्षमीकरणावर भर देऊन मुलापेक्षा मुलगी बरी या ओळी च्या माध्यमातून महिला विषयी महत्त्व पटवून दिले यावेळी रत्नाताई संगमनेरे यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगताना म्हटले की स्त्री-पुरुष संसाराची दोन चाके आहेत.

स्त्री-पुरुष याप्रमाणे आदिमानव आहे गुन्हेगारीला आळा प्रतिबंध घालण्यासाठी स्त्रीशक्तीने पुढे येण्याची गरज आहे व महिलांनी एकमेकींना हळदकुंकू लावून फुल गुच्छ देऊन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सदस्य सदस्य सोपान संगमनेरे यांनी महिला दिनाच्या महिलांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका डॉक्टर प्रशांत चौधरी चौधरी बचत गट महिला व उमेश पगारे रक्षा उगले पप्पू उगले योगिता लांडगे भाऊसाहेब निपुणगळे योगिता लांडगे प्रतिभा संगमनेरे कैलास संगमनेरे दीपक जाधव पप्पू उगले कृष्णा लांडगे शंकर संगमनेरे ग्रामसेवक दहिफळे व दिनकर आवारे आदीसह ग्रामपालिका सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते