विस्कळलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत व स्वतंत्र करा

  36

  ?पुरोगामी पत्रकार संघाची निवेदनाद्वारे मागणी

  ✒️नवनाथ पौळ(विशेष प्रतिनिधी)मो:-8080942185

  केज(दि.9मार्च):-पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा केज वतीने शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तसेच शहरातील वाढती वाहने ,वाहतूक हे लक्षात घेऊन कित्येक दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, कानडी रोड, मंगळवार पेठ ,जयभवानी चौक ,उमरी रोड, बस स्टँड समोर, शासकीय रुग्णालयाकडे, या दिशेला सर्व वाहन ही वाहने लावणाऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.

  शहराच्या मध्यवर्ती चार ही दिशेला, बेकायदेशीर वाहने , मोटर सायकल चार ,चाकी वाहने, ऑटो रिक्षा, बाजाराच्या दिवशी अशीच गर्दी पाहून ये-जा करणाऱ्या मोठमोठे वाहने आणि अवजड वाहने येण्यासाठी रस्ता अरुंद दिसून येत असतो. त्यामुळे वाहतूक शाखेचे याच्याचे दुर्लक्ष केलेले दिसून येते. बेकायदेशीर वाहने रोड च्या आजूबाजूला लावल्यामुळे तसेच अवजड वाहने सुध्दा त्याच्या आजूबाजूला लावल्या मुळे लागलेले आहेत.

  याबाबीकडे लक्ष वेधण्यासाठी व शहरातील गर्दी व वाहतुक व्यवस्था सुरळीत व स्वतंत्र करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा यासाठी निवेदन तहसील कार्यालय , पोलीस उपनिरीक्षकाना पुरोगामी पत्रकार संंघ शाखा केज च्या वतीने सामाजिक अडचण लक्षात घेऊन तालुकाध्यक्ष दत्तात्रय मुजमुले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आहे.यावेळी जिल्हा सचिव राजकुमार धीवर, तालुका सचिव रंजित घाडगे , तालुका उपाध्यक्ष हनुमंत गव्हाणे, शहराध्यक्ष अनिल वैरागे , तालुका कार्याध्यक्ष नवनाथ पौळ, अमोल सावंत व इतर पदाधिकर्यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.