निमगूळ गावाला प्रभारी जिल्हाधिकारींसह प्रशासनाचा ताफा

25

🔸नागरिकांनी आरोग्याची दक्षता घेण्यासह अनेकांची कान उघाळणी

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.10मार्च):-निमगुळ तालुका शिदंखेडा गावात मागील दोन दिवसात करोना आजाराचे छंपन्न पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासनाचीही झोप उडून गेल्याने,आज प्रभारी जिल्हाधिकारीसह तालुक्यातील सर्वच अधिकाऱ्यांच्या ताफ्याने निमगुळ गावाला भेट देत,रूग्णांची हिम्मंत वाढवत दक्षता घेण्याचे आव्हान केले. तसेच ज्यांनी गावात वाढत्या करोना रूग्णांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले, अशांची कान उघाडणी केले गेल्याने जनमानसात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

आज निमगुळ गाव कमी वेळात करोना आजाराचे धुळे जिल्ह्यात सर्वात मोठा हॉटस्पॉट बनून गेल्याने जिल्हा प्रशासनाची चांगली धावपळ उडाल्याचे चित्र लोकांना बघावयास मिळाले. कारण आज प्रभारी जिल्हाधिकारी श्री दिलीप जगदाळे यांनी दिलेल्या भेटीत, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, गटविकास अधिकारी संजय सोनवणे, निमगूळ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर वारे, मंडळ अधिकारी पंडित दावळे, सरपंच बापू सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य कल्याण बागल, हरी कुवर, माजी उपसरपंच दीपक बागल, शाळेचे मुख्याध्यापक तलाठी ग्रामसेवक आदी बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी श्री दिलीप जगदाळे यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना बाबत संबधितांसह गावातील लोकांना मार्गदर्शन केले.तसेच निमगूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्यावर गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळेचे मुख्याध्यापक, मंडळ अधिकारी, तलाठी वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेतली. त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची काय मदत लागेल, व येणाऱ्या काळात आपल्याला कोणकोणत्या प्रकारे उपाय योजना कराव्या लागतील यांचे मार्गदर्शन केले. दरम्यान गावात पाच पथके तयार केली असून प्रत्येक घराचा सर्व्हे सुरू आहे.

गेल्या दोन दिवसात छंपन्न रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात निमगुळ गाव ग्रामीण भागातील सर्वात मोठा हॉटस्पॉट झाले असून अप्पर तहसीलदार यांनी कंटेंटमेंट झोन जाहीर करत दहा दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. तद्नंतर गावातील सर्व प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच गावातील पतसंस्था, बँक, दुध डेयरी, दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तसेच उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल अप्पर तहसीलदार श्री सुदाम महाजन ,शिरपूर उपविभागीय अधिकारी श्री अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, डॉ. हितेंद्र देशमुख, मंडळ अधिकारी पंडित दावळे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी ,आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस यंत्रणा काम पाहत आहे.

दरम्यान प्रभारी जिल्हाधिकारी यांनी दोंडाईचा येथील नगर पालिका सभागृहात बैठक घेतली. त्यात नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम ,प्रांताधिकारी विक्रमसिह बादल विभागीय पोलीस अधिकारी अनिल माने अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ललीतकुमार चंन्द्रे, डॉ नरोटे, उपस्थित होते. त्यात दोंडाईचा शहरासह परिसरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समस्या व उपाय योजना बाबत माहिती जाणून घेऊन,योग्य त्या सूचना केल्या व चुकलेल्या काहींची कान उघाडणीही केल्याचे ही जनतेमध्ये बोलले जात आहे.