धडाडीचे सरपंच धडाडीचे कार्य

    32

    ✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

    माढा(दि.10मार्च):- तालुक्यातील उपळवटे गावाचे नुकत्याच नवनिर्वाचित सरपंच पदी विराजमान झालेले उपळवटे गावाचे धडाडीचे सरपंच बालाजी बाजीराव गरड पाटिल हे उपळवटे गावातुन लोकांच्या काय अडचणी आहेत त्या जाणुन घेण्यासाठी गावातुन फेरफटका मारताना उपळवटे गावातील वडार समाजातील बजरंग चौकात असणारा हायमास्ट दिवा गेल्या दोन महिन्यांपासून बंद होता कोणी महावितरण कर्मचारी लक्ष देत नव्हते ना अधिकारी लक्ष देत नव्हते उपळवटे गावांमध्ये राऊंड मारताना वडार समाजातील लोकांनी उपळवटे गावाचे सरपंच बालाजी गरड पाटिल यांना हायमास्ट दिवा गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याचे सांगितले त्याच बरोबर लगेच तात्काळ महावितरण कर्मचारी यांना बोलावून काही मिनिटांतच हायमास्ट दिवा दुरुस्ती करून घेतला मनामध्ये कोणताही मतभेद न बाळगता गावचा सरपंच हा गावच्या विकासासाठी सक्षम कार्य करत असल्याचे दिसत आहे वडार समाजाला अंधारातुन उजेडात आणण्याचे काम सरपंच बालाजी गरड पाटिल यांनी केले आहे त्यामुळे उपळवटे ग्रामस्थांनकडुन नविन सरपंचाचे आभार मानले जात आहेत उपळवटे गावातील कोणतीही रखडलेली कामे पुर्ण केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे बालाजी गरड पाटिल यांनी सांगितले.

    मानसाच्या अन्न वस्त्र निवारा ह्या तिन मुलभूत गरजा आहेत तशाच गावातील लोकांच्या लाईट पाणी आणि रस्ता ह्या तिन मुलभूत गरजा आहेत हे ओळखुन त्या पुर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना महामारी आजारापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आता कुठे परिस्थीती आटोक्यात येऊ लागली आहे तोपर्यंत कोरोना ने पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे त्यामुळे तोंडाला मास्क चा वापर करावा हात वारंवार स्वच्छ धुणे सोशल डिस्टनस ठेवणे आवश्यक आहे आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे सरपंच बालाजी गरड पाटिल यांनी सांगितले यावेळी उपस्थित उपळवटे गावाचे सरपंच बालाजी गरड पाटिल विलास जाधव अतुल लोंढे लक्ष्मण जाधव एकनाथ जाधव काळु जाधव आबा अनभुले आदि मान्यवर उपस्थित होत