शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय फक्त रयत शेतकरी संघटनाचं देऊ शकते- सौ. पुजाताई उदगट्टे

27

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.10मार्च):-दि.11. रयत शेतकरी संघटनेची स्थापना झाल्यापासून रयत शेतकरी संघटना महाराष्ट्रामध्ये विविध समाजातील घटकातील नागरिकांच्या प्रश्नावर सतत लढत आली आहे. कामगारांचे प्रश्न असतील, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तसेच महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेवर होत असलेल्या अन्याय – अत्याचाराच्या विरोधात रयत शेतकरी संघटना ही आज खऱ्या अर्थाने नागरिकांच्या प्रश्नावर झगडताना दिसत आहे रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुनिल भाऊ ठोसर हे आज महाराष्ट्रामध्ये तसेच देशामध्ये केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेल्या तीन काळया कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने लढताना आज दिसत आहे.

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेल्या तीन कायद्याविषयी महाराष्ट्रातील कुठलाही पक्ष रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या बाजूने केंद्र सरकारशी लढताना दिसत नाही, पण राज्यात कुठलीही सत्ता नसताना ॲड.रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत आहेत. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून रयत शेतकरी संघटनेने आज महाराष्ट्रामध्ये आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे व केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यालय,उपविभागीय कार्यालय,तहसील कार्यालय या ठिकाणी काही दिवसापूर्वी एक दिवसीय धरणे आंदोलन राबवले होते. महाराष्ट्रातील सर्व प्रस्थापित राजकीय पक्ष हे भाजप धार्जिणे आहे.

जेव्हा लोकसभेमध्ये व राज्यसभेमध्ये शेतकरी विरोधी कायदे तयार होत होते तेव्हा महाराष्ट्रातील शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस या पक्षांचे खासदार गैरहजर राहून या कायद्यास मुख्य संमती दिली होती तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने जाणुन घेतले पाहिजे की आपल्या प्रश्नावर कुठला राजकीय पक्ष लढत आहे ह्या प्रस्थापित पक्षाच्या पुढाऱ्यांचे शेतकऱ्यांच्या बाबतीत खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे आता शेतकऱ्यांनी ओळखलं पाहिजे. रयत शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने लढा देत आली आहे. रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांनी अशी भूमिका घेतली आहे की जोपर्यंत दिल्ली येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत रयत शेतकरी संघटना महाराष्ट्रामध्ये आंदोलन करीत राहील तेव्हा महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी रयत शेतकरी संघटनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहावे व आपल्या प्रश्नांची सोडवणूक रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करून घ्यावी. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय फक्त रयत शेतकरी संघटनाच देऊ शकते असे रयत शेतकरी संघटना प. महाराष्ट्र अध्यक्षा सौ पूजा उदगट्टे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.