चिमूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेची 553 प्रकरणे मंजुर

  32

  ✒️सुयोग डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

  चिमुर(दि.11मार्च):-संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरनाला मंजूरी देण्याच्या अनुशंगाने दिनांक 10 मार्च ला तहसील कार्यालयच्या सभागृहात नुकतीच बैठक पार पडली, या बैठकीत श्रावण बाळ योजने अंतर्गत 234, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजने अंतर्गत 161, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत 38, संजय गांधी विधवा योजने अंतर्गत 10, व अपंग योजनेतून 46 अस्या 553 प्रकरणांना मंजूरी प्रदान करण्ययत आली.

  महाविकास आघाडी सरकारच्या स्थापने नन्तर अनेक सरकारी समित्यांवर नव्याने नियुक्तया करण्यात आल्या, त्यातील प्रलंबित समित्यांच्या बैठकिना आता सुरुवात झाली असून चिमुर तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदाची धुरा संजय डांगरे यांचे हातात येताच दूसरी बैठक नुकतीच पार पडली, या बैठकीत सर्व प्रकारच्या अर्जाची तपासनी करण्यात आली, आवश्यक त्या कागदाची पूर्तता करणाऱ्या श्रावण बाळ योजने अंतर्गत 234, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजने अंतर्गत 161, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत 38, संजय गांधी निराधार विधवा योजने अंतर्गत 10, व अपंग योजनेतून 46 अस्या 553 प्रकारनाना मंजूरी देण्यात आली.

  या बैठकिला नायब तहसीलदार एन टी कौवे, अध्यक्ष संजय डोंगर, राजू यरने, राजू लोनारे, श्रीहरी सातपुते, स्वप्निल वासनिक, माधुरी आवारी, सुनील दाभेकर, देवेन्द्रा गजभिये, जयप्रकाश गेडाम, अजय चौधरी, उपस्तित होते
  ===

  ” चिमुर तालुक्यातील सर्व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थयानी कळविण्यात येत आहे की, कोरोनाचे प्रादुर्भावमुळे हयातीचे प्रमाणपत्र घेणे बंद आहे, तरी कोनिही अफवावर विश्वास ठेउ नये” – संजय डोंगर, अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना
  ——–/——/—–/——-/——-