महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद) अंतर्गत जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी

    41

    ?समृद्धी महिला ग्राम संघ पिपर्डा चा पुढाकार

    ✒️नितीन पाटील(विशेष प्रतिनिधी)मो:-7038121829

    नेरी(दि.11मार्च):-10 मार्च सायंकळी ७ वाजता समृद्धी महिला ग्राम संघा च्या वतीने जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी हा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला गावातील प्रथम नागरिक मा.आकाश भेंडारे सरपंच साहेब तथा ग्रामपंचायत सदस्य गण, अंगणवाडी सेविका आरोग्य विभागातील आशा वर्कर, आशा गतप्रवर्टक सौ शिला मेश्राम ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून त्यांनी आजची स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात कार्यरत राहून आप आपली भूमिका निभावत आहेत हे सगळं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मुळे शक्य झाले.

    म्हणून शिक्षण हे किती महत्वाचे असते हे महिलांना पटवून दिलं. शिक्षणासोबतच आरोग्यही तेवढेच महत्वाचे आहे म्हणून स्वच्छते विषयी मोलाचे मार्गदर्शन आशा गटप्रवर्टक सौ शीला मेश्राम यांनी केले. अध्यक्षीय भाषणात मा. आकाश भेंडारे सरपंच साहेब यांनी अपंग, विधवा,निराधार महिलांकरिता विविध योजना विषयी माहिती दिली.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुजाता चूनारकर तर आभार प्रदर्शन वृक्षमाला शेंडे व सहकार्य शालिनी चुनारकर यांनी केले तर हा सगळा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री किरणकुमार मेश्राम पशुव्यवस्थपक यांनी मोलाचे कार्य केले