नायगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा आर.एस.पडवळ यांचा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा

26

🔹सामाजिक कार्यकर्ते-शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी दिल्या शुभेच्छा

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधि)मो:-9307896949

नायगांव(दि.12मार्च):-संपूर्ण देशावरील सध्या कोरोनाचे संकट असल्याने नायगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. आर.एस.पडवळ साहेब यांचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, त्यांच्या जन्म दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते- शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी त्यांना उंदड आयुष्य,उत्तम,आरोग्य,यश कीर्ती लाभो.

यासाठी आज शिवानंद पांचाळ नायगांवकर त्यांचे चिरंजीव शिवांश शिवानंद पांचाळ यांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने नायगांव येथील पशुपती मंदिर येथे पुजा,आरती करून केली प्रार्थना या नंतर पोलीस स्टेशनला जाऊन दिल्या शुभेच्छा,कोरोना संकट आहे याच संकटाच्या काळात नायगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.पडवळ साहेब आपले कर्तव्य बजावत असताना स्वत: कोरोना पाॅजेटीव्ह आले.

या संकटावर मात करून तत्काळ त्यांनी आपल्या कर्तव्यावर हजर झाले,त्यांचे सहकारी व सर्व पोलीस स्टाॅप आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र न थकता जनतेची सेवा करत आहेत त्यांच्या मुळे आपण सर्वजण सुखरूप आहोत अश्या योध्दाचा सन्मान करणे आमचे भाग्य आहे, देशसेवा जनसेवा,करत असलेल्या सर्व कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्वाच्या उंदड आयुष्यासाठी आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करू असे मत शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी व्यक्त केले,