मुळशी खुर्द मधील खुनाचा उलगडा, एका आरोपीला अटक

97

✒️मुळशी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुळशी(दि.12मार्च):- मुळशी खुर्द ( ता.मुळशी ) येथे हाँटेल दिशाजच्या जवळ चिंचवड येथील मोहननगरचे शिवसेना माजी शाखाप्रमुख विजय सर्जेराव सुर्वे ( वय.४०, रा. सर्वे नं १३५ मोहननगर, चिंचवड) यांचा मृतदेह गावकय्रांना सकाळी मिळून आला होता. याप्रकरणी पौड पोलिसांनी आरोपीला अवघ्या आठ तासात अटक केली आहे.

बुधवार ( दि.१०) रोजी सकाळी कामावर जाणाऱ्या येथील नागरिकांना प्रथम दारू पिऊन कोणी पडले असेल म्हणून दुर्लक्ष केले. माञ हि पडलेली व्यक्ती पालथी पडलेली असून अंगातून रक्तस्त्राव येत होता. असे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने या घटनेची माहिती पौड पोलिसांना देण्यात आली. यानंतर पौड पोलिसांनी यातील आरोपी हर्षद अशोककुमार राठोड ( वय.२९, रा. निगडी ) याला शिताफीने गुन्हा घडल्यानंतर आठ तासाच्या आत अटक केली आहे.तर दुसरा आरोपी मोहम्मंद फरार झालेला आहे.

पोलिस अधिक्षक डाँ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ. सई भोरे पाटील यांनी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट,पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांना गुन्ह्याचा तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, भालचंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, मृगदीप गायकवाड,सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष कुंभार, सचिन शिंदे, पोलिस हवालदार शंकर नवले,अनिता रवळेकर, पोलिस नाईक चंद्रशेखर हगवणे, राँकी देवकाते, पोलिस काँन्सटेबल सिध्देश पाटील,राजेश गायकवाड,नामदेव मोरे,सागर नामदास, साहिल शेख, अनिकेत सोनवणे, ईश्वर काळे यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पोलिस नाईक राँकी देवकाते, पोलिस काँन्सटेबल सिध्देश पाटील,राजेश गायकवाड हे पथक पिंपरी – चिंचवड शहरात आरोपीचे शोध घेत होते. दरम्यान तांञिक दृष्ट्या तपास करुन आरोपी हर्षद राठोड याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार मोहमंद याच्या मदतीने खून केल्याचे कबूल केले.

सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयातील सायबर विभागाचे पोलिस काँन्सटेबल सुनिल कोळी व चेतन पाटील यांनी विशेष सहकार्य केले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ हे करीत आहेत.