आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथे पदवी वितरण समारंभ

72

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.12मार्च):- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सांस्कृतिक भवनात पदवी वितरण समारोह आयोजित करण्यात आला.या समारंभा करिता आदरणीय चंदनसिंग रोटेले, व्यवस्थापन सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर हे लाभले तर प्रमुख अतिथी मा. प्राचार्य डॉ. धम्मानी सर, मा. प्राचार्य डॉ. जाने सर उपस्थित होते या पदवीदान समारोहाची सुरुवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व विद्यापिठ गीताने झाली त्यानंतर प्राचार्य डॉ. शुभांगिनी वडस्कर यांची गोंडवाना विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. चंदनसिंग रोटेले यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

त्यानंतर प्राचार्य डॉ. धम्मानी सर व प्राचार्य डॉ. जाने सर यांचीसुद्धा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे संस्थाध्यक्ष मा. डॉ. चंदनसिंग रोटेले यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ द्वारे सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना डॉक्टर वडस्कर मॅडम यांनी महाविद्यालय बाबत परिचय करून दिला महाविद्यालयांची प्रगती दिवसेंदिवस कशी होत आहे .याबाबत सविस्तर माहिती दिली त्यानंतर डॉ. धम्मानी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अनेक उदाहरणाच्या माध्यमातून पदवी चे महत्व स्पष्ट केले पदवीचे महत्त्व स्पष्ट करत असतानाच महाविद्यालयात आजपर्यंत अनेकदा विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून निवड होत आली.

त्यामुळे हे महाविद्यालय म्हणजे सिनेट सदस्यांची खान असल्याचे निदर्शनास येत आहे आणि विद्यापीठाच्या नीतिनियम तयार करण्यापासून चा अभ्यास येथील लोकांना आहे याची प्रचिती येत आहे त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य जाने सर यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केलं यांनीसुद्धा अनेक उदाहरणासह आपले विचार स्पष्ट केले.त्यानंतर संस्थाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.चंदनसिंह रोटेले यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून अतिशय उत्स्फूर्त असं मार्गदर्शन करताना सांगितले की चिमूर सारख्या ग्रामीण व आदिवासी भागातून समाजकार्याची पदवी ग्रहण करून मोठमोठ्या पदावर जाऊन काम करणार आहात त्यामुळे तुमच्यात ते कलाकौशल्य असणे अत्यंत आवश्यक आहे.

 कारण या समाजकार्याच्या अभ्यासक्रमात ह्या सर्व गोष्टींचा समावेश असतो आणि आपल्यासाठी शासनाने अनेक मोठी पद निर्माण केलेली आहेत त्या पदाच्या माध्यमातून कार्य करून समाजातील लोकांची सेवा करणे हेच एक अपेक्षित आहे . त्यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. शेवटी या कार्यक्रमाची सांगता प्रा. हेमंत वरघने यांनी आभार प्रदर्शन करून केली तर कार्यक्रमाचे संचालन डॉ. चंद्रभान खंगार यांनी केले.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.