नेर येथे वीर एकलव्य जयंती साद्या पद्धतीने साजरी

32

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.12मार्च):- नेर येथे सालाबादाप्रमाणे विर एकलव्य जयंती साजरी करण्यात आली.नेर गावातून भव्य अशी मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती. विर एकलव्य मित्र मंडळ व आदिवासी समाज बांधवांकडून जयंती व महाशिवरात्र साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. त्याच प्रमाणे कट्टर आदिवासी युवा प्रतिष्ठान ग्रुप तर्फे वीर एकलव्य प्रतिमचे फलक अनावरण करण्यात आले. दरवर्षी मोठ्या उत्साहात विर एकलव्य जयंती साजरी केली जाते.

परंतु यंदा कोरोनाच्या पादुर्भाव लक्षात घेता वीर एकलव्य मित्रमंडळातर्फे जयंती केवळ अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विर एकलव्य यांच्या पुतळ्यास पुष्पहार टाकून जयंती ही साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली यावेळी नाना मालचे,दिपक मोरे, मांगु मोरे, बाबुलाल मोरे,गोटु मेंबर,गणु जयस्वाल,धावल ठाकरे,वामन मोरे,बापु मेंबर,छोटु मालचे,गणेश मोरे आदी वीर एकलव्य मित्र मंडळ आदिवासी समाज बांधव व नेर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.