चिमूर पंचायत समिती मध्ये मनमानी पद्धतीने केले चुकीची वेतन निश्चिती

  35

  ?महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिति सरचिटणीस गोविंद गोहने यांचा आरोप

  ✒️सुयोग डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

  चिमुर(दि.12मार्च):-जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत सहाय्यक शिक्षकांना दिनांक 03 फेब्रुवारी 2021 चे आदेशान्वये 242 सहाय्यक शिक्षकांना वरिष्ठ मंजूर करण्यात आली होती. परंतु या आदेशात मंजूर वेतन श्रेणी चुकीची असल्याने सुधारित आदेश किंवा शुद्धीपत्रक येणे क्रमप्राप्त होते.नियमानुसार वरिष्ठ श्रेणी लागू झाल्यानंतर एक महिन्याचे आत संबंधित लाभार्थी कडून विकल्प मागवून घेणे कार्यालयाला गरजेचे आहे व त्यानुसार वेतननिश्चिती करायला पाहिजे. परंतु पंचायत समिती चिमूर चे लिपिकांनी शुद्धीपत्रकाची वाट न पाहता किंवा कोणत्याही शिक्षकांकडून विकल्प ना मागवता मनमानी पद्धतीने शिक्षकांचे सेवापुस्तकात वेतननिश्चिती केली.

  एकीकडे वेतन देयके वेळेत बनवू न शकणाऱ्या लिपिकांनी वेतन निश्चितीला केलेली घाई का केली असा प्रश्न महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीचे तालुका सरचिटणीस गोविंद गोहणे यांनी केला आहे.शिक्षण विभाग चिमूर चे लिपिकांना शिक्षकांचे वेतन देयके वेळेत करता येत नाही, देयके केल्यावरही अनेक प्रकारच्या कपातीचा त्रुट्या जसेच्या तसेच बिलात असतात. असे असतांना चुकीची वेतन निश्चिती का केली? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शिक्षण विभागात काही चार दोन शिक्षक नेहमीच पडून असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे.

  शिक्षकांची सेवापुस्तके हाताळण्यापासू तर अनेक चुकीची कामे संबंधित शिक्षकांकडू लिपिक करून घेतात. आणि या कडे गट शिक्षणाधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही गोविंद गोहणे यांनी केला.मनमानी पद्धतीने केल्या वेतननिश्चिती मुळे भविष्यात वेतन पडताळणी सारख्या अनेक समस्यांना शिक्षकांना सामोरे जावे लागल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न गोविंद गोहणे यांनी केला आहे. दिनांक 10 मार्च चे शुद्धीपत्रकानुसार जावक क्रमांक व द्यावयाची वेतन श्रेणी यात बदल झालेला आहे.